घरफोडी करून सिनेस्टाईल परराज्यात फरार होणाऱे तीन अट्टल चोर जेरबंद !

आरोपीकडून बारा लाख तेरा हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त
पिंपरी : घरफोड्या करून परराज्यात सिनेस्टाईल धूम ठोकणाऱ्या तीन अट्टल चोरांना गुन्हे शाखा युनिटीने चाकण पोलीस स्टेशन हद्दीत इंद्रायणी हॉटेलच्या समोर, पुणे नाशिक हायवे लगत वाकी येथे सापळा लावून जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या चांदीचे व रोख रक्कम 12 लाख 13 हजार 528 आणि एक टेम्पो, एक दुचाकी असा एकूण 25 लाख 13 हजार 598 किमतीचा माल जप्त केला .

गुन्हे शाखा युनिट तीन पिंपरी चिंचवड कडील पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे, पोलीस उपनिरीक्षक भरत गोसावी, पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे आणि पोलीस कर्मचाऱी पुणे -नाशिक हायवे वरील वाकी येथे सापळा लावून थांबले असताना एका पांढऱ्या रंगाच्या टाटा टेम्पो मध्ये पाठीमागे एक विना नंबरची दुचाकी गाडी व समोर केबिनमध्ये तीन इसम संशयितरित्या बसल्याचे दिसून आले. या टेम्पो जवळ पोलीस पथक जात असताना आत मध्ये बसलेल्या इसमांना संशय आल्याने त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला .गुन्हे शाखा युनिट तीन कडील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या शितापीने बळाचा वापर करून संशयित मशीन शौकत आली शेख (वय 32 वर्ष, रा लोहिया नगर, सत्यकम स्कूल जवळ ,एम ब्लॉक मेरठ उत्तर प्रदेश), उदयवीर मल्लखांब सहासी (वय 36, रा गल्ली नंबर 3, प्रताप नगर जय भीम नगर, मेरठ उत्तर प्रदेश), विनय कुमार गंगासरण (वय 34 ,ग्राम बिजली ठाणा ,खरखोदा मेरठ, उत्तर प्रदेश) यांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडील बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येत असलेले साहित्य ,टेम्पोमध्ये विना नंबरची दुचाकी व आरोपींकडे सोने चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून आली ,सोने चांदीचे दागिने व रकमेबाबत आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही मेरठ उत्तर प्रदेश येथून एका चार चाकी वाहनात दुचाकी टाकून पिंपरी चिंचवड शहरात वाहन पार्क करून दुचाकीने घरफोड्या करून परत शंभर ते दीडशे किलोमीटर पोलिसांना समजू नये व थांगपत्ता लागू नये म्हणून दुचाकी वर जातो व त्यानंतर निर्जन स्थळी दुचाकी ही टेम्पोमध्ये टाकून मेरठ उत्तर प्रदेश येथे निघून जातो असे सांगितले .आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेला टाटा कंपनीचा पांढऱ्या रंगाचा टेम्पो (यू.पी 15 जे. टी 25 92), एक होंडा कंपनीची शाईन दुचाकी, एक मोबाईल फोन ,इतर साहित्य तसेच सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण बारा लाख लाख 13 हजार 598 किमतीचे जसेच्या तसे व 13 लाख रुपये किमतीचे नवीन एक टेम्पो व दुचाकी 48 तासांचे आत जप्त केले,
याबाबत दिघी ,चाकण, काळेवाडी, सांगवी या चार ठिकाणी या आरोपीनी घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.
पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे पुढील तपास करीत आहेत .या कारवाईत पोलिस अमंलदार बाबासाहेब गर्जे, सोमनाथ बोऱ्हाडे, सागर सूर्यवंशी, श्रीधन इचके, संदीप सोनवणे, मनोज साबळे ,ऋषिकेश भोसुरे, अजित रुपनवर, योगेश कोळेकर ,शशिकांत नांगरे, बाळासाहेब भांगले ,स्वप्निल महाले ,सुंदर थोरात, समीर काळे ,सुधीर दांगट, दिलीप राठोड, तुषार वराडे, निखिल फापाळे, प्रदीप राळे, राजकुमार इधारे या पोलीस पथकांचा समावेश आहे,
पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे पोलीस सह आयुक्त डॉक्टर शशिकांत महावरकर अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड पोलीस उपायुक्त गुन्हे डॉक्टर शिवाजी पवार सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

