फक्त मुद्द्याचं!

5th February 2026
गुन्हेगारी

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत  गांजा विक्रीचे पेव!

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत  गांजा विक्रीचे पेव!

एक लाख 72 हजार 949 रुपये किमतीचा तीन किलो चारशे चार ग्रॅम गांजा ताब्यात
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीतील सात पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांजा विक्रीचे पेव वाढले आहे .मंगळवार 9 डिसेंबर रोजी पिंपरी ,तळेगाव एमआयडीसी, महाळुंगे एमआयडीसी ,तळेगाव दाभाडे, बावधन, रावेत आणि दापोडी या पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक लाख 72 हजार 949 रुपये किमतीचा तीन किलो चारशे चार ग्रॅम गांजा विक्री करताना पोलिसांनी पकडला आहे. याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एक अल्पवयीन असल्याने त्याला नोटीस देण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन आरोपीने 160 50 रुपये किमतीचा 3 21 ग्रॅम गांजा अवैधरित्या स्वतःकडे बाळगून विक्री करत होता.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे हद्दीत 35 हजार 600 रुपये किमतीचा सहाशे ग्रॅम गांजा एका महिला आरोपीने अवैधरित्या विक्रीसाठी आपल्याकडे बाळगला होता. या महिलेला अटक करण्यात आली आहे.

बावधन पोलीस स्टेशनच्या हद्दीत कंपनीच्या मोकळे मैदानात शिवप्रसाद हॉटेलच्या पुढे ,क्षत्रिय वस्तीजवळ ,बावधन येथे गोपाल चंदू राठोड (वय 48, रा. शिंदे वस्ती, नांदे ,ता. मुळशी) या आरोपीने 23,550 किमतीचा 471 ग्राम वजनाचा गांजा विक्रीसाठी बाळगला होता .आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पिंपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत निराधार नगर ,सार्वजनिक रोडवर, पिंपरी येथे आरोपी दीपक शरद गायकवाड (वय 39 रा. सार्वजनिक शौचालय शेजारी, रमाबाई आंबेडकर नगर, पिंपरी) या आरोपीने 18500 किमतीचा 437 ग्रॅम वजनाचा अमली पदार्थ गांजा बाळगला होता .त्याला पोलिसांनी अटक केली आहे.

तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत जांभवडे रोडला साहेबराव काशीद यांच्या चाळीसमोर ,इंदोरी ,ता. मावळ येथे आरोपी सलीम हुसेन मुजावर (वय 63 ,कमल कुंज बिल्डिंग, रूम नंबर 12, संदीप काशीद यांच्या भाड्याच्या रूममध्ये साईनगर ,इंदोरी, ता. मावळ मूळ रा. तडवळा कसबे, ता .जि धाराशिव )या आरोपीस 35 (3) प्रमाणे नोटीस बजावली आहे .आरोपी जवळ 28 हजार 784 किमतीचा 578 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. बेकायदेशीर रित्या जवळ बाळगला .हा गांजा त्याने कोणाकडून घेतला याबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता माहिती दिली नाही .

रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्काय लाईन सोसायटी, लेबर कॅम्पचे पाठीमागे, मोकळ्या जागेमध्ये आरोपी संजय कुमार अशोक पासवान (वय 24, रावानता सोसायटीचे जवळ, भारत पेट्रोल पंपाच्या मागे, ताथवडे) या आरोपीने 27 हजार 800 रुपये किमतीचा 556 ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी बाळगला .यावरून त्याला अटक करण्यात आली आहे .

दापोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत ,एसटी वर्कशॉप, दापोडी पुणे येथील रोडवर 9 डिसेंबर रोजी आरोपी योगेश श्याम दुनघव (वय 19 ,रा सरस्वती आश्रमाच्या जवळ, दापोडी) या आरोपीने 22 हजार 660 रुपये किमतीचा एकूण 441 ग्रॅम वजनाचा गांजा विक्री करता बाळगला होता. दापोडी पोलिसांनी कारवाई करून त्याला ताब्यात घेतले .पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये विविध ठिकाणी पोलिसांनी कारवाई करून आरोपींना ताब्यात घेतले आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"