Skip to main content

फक्त मुद्द्याचं!

7th July 2026
पुणे

पहिली औद्योगिक महिला क्रिकेट स्पर्धा; बजाज ऑटो आकुर्डीच्या क्रीडांगणावर!

पहिली औद्योगिक महिला क्रिकेट स्पर्धा; बजाज ऑटो आकुर्डीच्या क्रीडांगणावर!

औद्योगिक क्रीडा संघटनेच्या वतीने आयोजीत
 पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटनेच्या ६२व्या वर्षी पहिली औद्योगिक महिला क्रिकेट स्पर्धा बजाज ऑटो आकुर्डीच्या क्रीडांगणावर सुरू झाली.औद्योगिक महिला क्रिकेट स्पर्धा ही औद्योगिक क्षेत्राच्या इतिहासामधे प्रथमच घेण्यात आलेली आहे.सदर स्पर्धा बाद पद्धतीने मर्यादित ६ षटकांची असेल.बजाज ऑटो ग्रीन,बजाज ऑटो ब्ल्यू, जेसीबी, प्राज इंडस्ट्रीज, महिंद्रा अँड महिंद्रा, इन्फोसिस, एमक्युअर, थरमॅक्स, फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स, फॉरविया फॉरेशिया, एयुओ मोबिलिटी व स्पार्क मिंडा या कंपन्यांच्या महिला संघांनी भाग घेतला आहे.ही स्पर्धा दोन दिवस चालणार आहे.

viara vcc
viara vcc

या स्पर्धेचे उद्घाटन बजाज ऑटोचे एडमिन मॅनेजर व स्पोर्ट्स ऑफिसरअतुल काळोखे,औद्योगिक क्रीडा संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कदम यांनी केले;यावेळी बोलताना अतुल काळोखे म्हणाले की, औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांसाठी ही स्पर्धा प्रथमच होत आहे.सर्व वयोगटातील खेळाडूंना पाहून आम्हाला अतिशय आनंद होत आहे.यावेळी खजिनदार प्रदीप वाघ यांनी प्रास्ताविक,सचिव वसंत ठोंबरे यांनी खेळाडूंना सर्व स्पर्धेची नियमावली समजवताना सुरक्षित खेळण्यास व खेळाचा आनंद लुटण्याचे आवाहन केले तर सहखजिनदार विजय हिंगे यांनी या स्पर्धे मागील हेतू विशद केला.

यावेळी औद्योगिक क्रीडा संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र नागेशकर,प्राज इंडस्ट्रीजचे व्हाईस प्रेसिडेंट मिलिंद बावा,एमक्युअर एचआर मॅनेजर अर्देशिर झुबीन,स्पर्धाप्रमुख हरी देशपांडे,सचिव वसंत ठोंबरे,जेसीबी एचआर मॅनेजर दयानंद नरवडे,जेसीबी स्पोर्ट्स कमिटीचे सचिन कांबळे,महिंद्रा अँड महिंद्रा स्पोर्ट्स कमिटीचे श्रीनिवास मोरे,आर्यन ट्रॉफी वर्ल्डचे अमित कदम, मंदार कुलकर्णी,ज्येष्ठ खेळाडू रियाज उतावळे उपस्थित होते.

स्पर्धेचे निकाल खालील प्रमाणे
१) एयुओ मोबिलिटी विरुद्ध बजाज ऑटो ग्रीन या पहिल्या सामन्यांमध्ये बजाज ऑटो ग्रीन संघाने ९ गडी राखून विजय मिळविला.
एयुओ मोबिलिटी ४८ धावा ६ षटके २ बाद:-गौरी बधे ३६,निकिता आंब्रे १८/१
बजाज ऑटो ग्रीन ४९ धावा ४.१ षटके १ बाद:-कौशिकी पंडित ३०,गौरी बधे ५/१

२) एमक्युअर व मिंडा कार्पोरेशन यांत झालेल्या सामन्यांमध्ये एमक्युअर संघाने ३२ धावानी विजय मिळविला.
एमक्युअर ८९ धावा ६ षटके बिनबाद:-ऐश्वर्या येडवे २८,अनिता बुगडे ५१
मिंडा कार्पोरेशन ५७ धावा ६ षटके ५ बाद:-रक्षंदा शेटे २६,अनिता बुगडे ७/२,

३) प्राज इंडस्ट्रीज विरुद्ध फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स यांत झालेल्या सामन्यांमध्ये प्राज इंडस्ट्रीजने २१ धावानी विजय मिळविला.
प्राज इंडस्ट्रीज ५२ धावा ६ षटके ३ बाद:-मंजिरी जोशी २६,स्मितल मयेकर ११,नाजो परवीन १२/२.
फ्लॅश इलेक्ट्रॉनिक्स ३१ धावा ६ षटके ७ बाद:-अंजली डोंगरे १०,मीता पडनाद २/१,सुचिता गोरे ४/१,स्मितल मयेकर ६/१

४) फॉरविया फॉरेशिया विरुद्ध बजाज ऑटो ब्ल्यू यांत झालेल्या सामन्यांमध्ये बजाज ऑटो ब्ल्यू संघाचा २ धावानी विजय .
बजाज ऑटो ब्ल्यू ५० धावा ६ षटके ४ बाद:-अस्मिता मोरे १९,ज्ञानेश्वरी काळे १०/२.
फॉरविया फॉरेशिया ४८ धावा ६ षटके ५ बाद:-शर्मिला साळुंखे १९,ज्ञानेश्वरी काळे १३,स्नेहा नाईक ११/२,ऋतुजा पाटील ६/१, आशा दुबे २/१

५) थरमॅक्स विरुद्ध जेसीबी यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये थरमॅक्स ५९ धावांनी विजयी झाली.
थरमॅक्स ८८ धावा ६ बाद २ षटके:-योगिता जगदाळे ४२,ऋतुजा इंगळे ३०,श्रेया बहाळकर १२/१
जेसीबी ३० धावा ६ षटके ३ बाद:-श्रेया बहाळकर २२,गायत्री यादव २/१

६) इन्फोसिस विरुद्ध महिंद्रा अँड महिंद्रा यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये इन्फोसिसनी ६२ धावांनी विजय मिळविला.
इन्फोसिस ९९ धावा २ बाद ६ षटके:-सपना बागुल ५१,अपेक्षा माने २६,आश्लेषा कोळपकर १०,पूजा दाभाडे १७/१
महिंद्रा अँड महिंद्रा ३७ धावा ६ षटके:-श्वेता फाफळे १२,दीप्ती लांडे ११,रूपाली कलंत्रे ३/२,अवंती वाढोकर १/२

७) एमक्युअर विरुद्ध बजाज ग्रीन यांच्यात झालेल्या सामन्यांमध्ये बजाज ऑटो ग्रीन संघ १० गडी राखून विजयी झाला.
एमक्युअर ५० धावा ६ षटके ३ बाद:-अनिता बुगडे १९,अर्चना घाडगे १०,निकिता कांबळे ९/१
बजाज ऑटो ग्रीन ५१ धावा ६ षटके बिनबाद:-निकिता आंबरे १८,कौशिकी पंडित २६,

८) थरमॅक्स विरुद्ध प्राज इंडस्ट्रीज यात झालेल्या सामन्यांमध्ये प्राज इंडस्ट्रीज ९ गडी राखून विजयी झाली.
थरमॅक्स ४२ धावा ६ षटके ४ बाद:- गायत्री यादव ८,मिता पडनाद ७/१,स्मितल मयेकर ५/१,सुचिता गोरे २/१
प्राज इंडस्ट्रीज लिमिटेड ४३ धावा ६ षटके १ बाद:-रश्मी देशमुख ११,स्मितल मयेकर २६,पल्लवी उप्पे ३/१

९)बजाज ऑटो ब्ल्यू विरुद्ध इन्फोसिस यांच्यात झालेला सामना मध्ये बजाज ऑटो ब्ल्यूने ३ धावांनी विजय मिळविला.
बजाज ऑटो ब्ल्यू ५३ धावा ६ षटके ३ बाद:- अस्मिता मोरे १८,रिद्धी कलंत्रे २०,रूपाली कलंत्रे १२/१
इन्फोसिस ५० धावा ६ षटके १ बाद:-सपना बागुल २९,अवंती वाढोकर १०,आशा दुबे ११/१

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"