रिक्षात प्रवासी भरण्यावरून वाद!

पिंपरी : प्रवाशी भरण्याच्या शुल्लक कारणावरून भोसरी येथील पीएमटी चौकात रिक्षा चालकाला मारहाण करण्याची घटना घडली आहे .या भांडणांमध्ये मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या दोन नागरिकांनाही आरोपीने लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केले आहे. सोमवार दिनांक एक डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भोसरी पीएमटी चौकात ही घटना घडली. रिक्षाचालक अजय गजानन खानझोडे (23) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार संकेत रावते आणि त्याचा एक अनोळखी साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी रिक्षात प्रवासी घेत असताना आरोपी तिथे आले आणि तू रिक्षात प्रवासी कसे काय भरले असे म्हणून त्यांनी फिर्यादीला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादीचा मित्र रोहन डोंगरे हा मध्ये पडला असता आरोपीने त्याच्या डाव्या हातावर लोखंडी पाईप ने मारून जखमी केले. तसेच याच ठिकाणी बाजूने जात असलेले काबुल शेख यांनाही आरोपीने लोखंडी पाईप डोक्यात मारून गंभीर दुखापत केली.
बेकायदा गांजाची विक्री
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने हिंजवडी परिसरात मोठी कारवाई केली आहे .बेकायदा गांजाची विक्री आणि वाहतूक करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 55 हजार रुपयाहून अधिक किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्रिलोकनाथ रमेश गुप्ता (34 रा. भेकराईनगर पुणे )असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

