कोयत्याने हल्ला करून तीन लाख 80 हजार रुपये लुटणाऱ्या आरोपींना अटक!

गुंडाविरोधी पथकाची कारवाई
पिंपरी : चिंचवड येथील श्रीजी सिरॅमिक दुकानात चार अनोळखी व्यक्तींनी कोयत्याने हल्ला करून तीन लाख 80 हजार रुपये लुटणाऱ्या टोळीला गुंडाविरोधी पथकाने अटक केली आहे. याबाबत श्रीजी सिरॅमिक केशवनगर चिंचवड दुकानाचे मालक दीपक नरसाणा यांनी फिर्याद दाखल केली आहे .या दहशत माजवणाऱ्या चार जणांविरुद्ध चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार यांनी दिली .

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास श्रीजी सिरॅमिक दुकानात चार अनोळखी व्यक्तींनी शास्त्राचा धाक दाखवून आणि आशिष रजनबा व फिर्यादी यांच्यावर धारदार शास्त्राने वार करून जखमी केले .तसेच फिर्यादी नरसाणा यांच्या ताब्यातील तीन लाख 80 हजाराची बॅग जबरदस्तीने हिसाकावून चोरी करून हातातील धारदार शस्त्राने दहशत माजवून पळून गेले. सदर गुन्ह्याचा समांतर तपास करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे आणि अन्य वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर याप्रकरणी तपास करण्यासाठी वेगवेगळ्या टीम बनवण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पोलीस निरीक्षक एच व्ही माने ,पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे व गुंडा विरोधी पथकातील अंमलदार यांनी सीसीटीव्ही फुटेज व खास बातमीदारामार्फत या अनोळखी इसमानपैकी संशयीत आरोपी एस रमेश अंधारे (वय 18 ,रा. अर्चनाताई बारणे घराच्या शेजारी बोर्हाडे बिल्डिंग, चांदणी चौक, थेरगाव गावठाण ,मुळगाव मु पो भोनजे, ता. बार्शी ,जिल्हा सोलापूर ),रितेश मुकेश चव्हाण (वय 18 ,रा. जगताप नगर ,नंबर चार व पाच थेरगाव ),भूपेंद्र रूप वसंत बैद (वय 19 ,रा. सुभाष नगर झोपडपट्टी ,रिव्हर रोड, आंबेडकर कॉलनी पिंपरी) व विधी संघशीत बालक यांना थेरगाव स्मशानभूमी इथून ताब्यात घेतले. दाखल गुन्ह्याबाबत आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्यात सहभागी असल्याचे कबूल केले .
ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर ,अप्पर पोलीस आयुक्त एचडी आवाड, पोलीस उप आयुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एच. वि. माने ,पोलीस उपनिरीक्षक समीर लोंढे, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुमार तापकीर, सहाय्यक पोलीस फौजदार ठोकळ ,विक्रम जगदाळे, अमित गायकवाड, पोलीस हवालदार गणेश मेदगे , गंगाराम चव्हाण, विजय गंभीरे ,सुनील चौधरी, मयूर दळवी ,विजय तेलेवार ,श्याम बाबा ,नितीन गेंगजे, रामदास मोहिते ,विजय वेळापुरे ,सुहास कदम, ज्ञानेश्वर गिरी, तौशीफ शेख यांनी ही कारवाई केली ,कोयत्याने हल्ला करून तीन लाख 80 हजार रुपये लुटणाऱ्या आरोपींना अटक गुंडाविरोधी पथकाची कारवाई

