फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
गुन्हेगारी

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची धाडसी कारवाई; गुटख्याची विक्री करणाऱ्या आरोपीस केली अटक!

मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाची धाडसी कारवाई; गुटख्याची विक्री करणाऱ्या आरोपीस केली अटक!

11 लाख 47 हजार 900 रुपये किंमतीचा गुटखा जप्त
पिंपरी : मुंबई पुणे महामार्गावरील सर्विस रस्त्यालगत अचीड हॉटेल जवळ बालेवाडी येथे मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई करून एम .एच. 12 RN -3203 क्रमांकाच्या ट्रकमध्ये अवैधरित्या गुटखा वाहतूक करत असल्याचे आढळून आले .मालमत्ता गुन्हे विरोधी पथकाने कारवाई करून 36 लाख 47 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये 11 लाख 47 हजार 900 रुपये किमतीचा गुटखा आढळून आला. अशी माहिती पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार यांनी दिली. बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

viara vcc
viara vcc

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीमधील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याची सूचना पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सर्व विभागांना दिली होती. त्यानुसार मालमत्ता गुन्हे विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार याबाबत चौकशी करत असताना पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे व पोलीस हवालदार नितीन लोखंडे यांना मुंबई पुणे महामार्गावर बालेवाडी येथे एक ट्रक गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ ,सहाय्यक पोलीस निरीक्षक रावसाहेब मोटे, पोलीस उपनिरीक्षक महेश खांडे ,पोलीस हवालदार नितीन लोखंडे, गणेश कोकणे ,पवन वाजे, पोलीस शिपाई समीर रासकर, सुमित देवकर ,अमर कदम ,ज्ञानेश्वर कौलगे हे वरील ठिकाणी पेट्रोलिंग करत असताना मुंबई पुणे महामार्गाच्या सर्विस रस्त्यालगत अचीड हॉटेल जवळ एम .एच. 12 RN -3203 हा ट्रक आढळून आला. हा ट्रक ताब्यात घेऊन नरेश गणेश चौधरी (वय 22 रा. वेलकम होम अप्लाय रोड, भोसरी) या व्यक्तीकडे ट्रक साहित्यबाबत चौकशी केली तेव्हा त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली .पंचा समक्ष ट्रक मधील मालाची पाहणी केली असता 11 लाख 47 हजार 900 रुपये किमतीचा गुटखा आढळून आला.

.नरेश चौधरी याच्या विरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रक मधील गुटखा आणि ट्रक असे मिळून 36 लाख 47 हजार 900 रुपये किमतीच्या मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. बावधन पोलीस पुढील तपास करीत आहेत.

पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे ,सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर .अप्पर पोलीस आयुक्त सारंग आवाड, पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. शिवाजी पवार ,सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"