पिस्तूल बाळगणाऱ्या तरुणाला अटक!

पिंपरी : चाकण पुणे रस्त्यावरील भारत पेट्रोल पंपाच्या बाजूला एका तरुणांकडून देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुस जप्त करण्यात आले .याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे .शनिवार 22 नोव्हेंबर रोजी माधव रोहिदास गीते (अठ्ठावीस मेदनकरवाडी ,चाकण ,ता. खेड, जि. पुणे )असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. .गुन्हे शाखा युनिट दोन मधील पोलिसअंमलदार सुखदेव सूर्यभान गावंडे यांनी शनिवारी याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी माधव यांच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार सापळा लावून त्याला ताब्यात घेतले .त्याची झडती घेतली असता आरोपीकडे एक पन्नास हजार रुपयाचे देशी बनवटीचे पिस्तूल आणि एक हजार रुपयांचे एक जिवंत काडतुस असा ऐवज मिळून आला. चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत .

