खंडणीप्रकरणी पाच जण अटकेत!

पिंपरी : महाळुंगे इंगळे परिसरात दिल्ली दरबार हॉटेलमध्ये पाच जणांनी घुसून दमदाटी केली. स्वतःला क्राईम ब्रँच अधिकारी असल्याचे सांगून 45 हजार रुपये खंडणी घेतली तसेच दोन लाख रुपयांची मागणी केली. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करून पाचही आरोपींना अटक करण्यात आली .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास पाच आरोपी फिर्यादी यांच्या दिल्ली दरबार हॉटेलमध्ये आले .त्यांनी हॉटेलचे शटर खाली ओढून आत येऊन ग्राहकांना बाहेर काढले .फिर्यादी यांना आत टाकण्याची धमकी दिली. तसेच आरोपी पांडुरंग साळुंखे यांनी आपण क्राईम ब्रँच अधिकारी आहोत असे सांगत दोन लाख रुपयांची मागणी केली. एटीएम मधून 45 हजार रुपये काढून आरोपींना देण्यास भाग पाडले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये भारत चंद्रकांत ओव्हाळ 29 राहणार त्रिमूर्ती निवास स्टार कॉलनी लक्ष्मी चौक हिंजवडी), पांडुरंग तुकाराम साळुंखे (32 राहणार ,शकुंतला सोसायटी कीर्ती नगर सिंहगड वडगाव बुद्रुक ),कल्पेश संजय खैरनार( 29 मोतीलाल तालिया इंग्लिश मीडियम स्कूल जवळ, मोशी ),कृष्णा उर्फ किशोर काळे (31 आपुलकी हॉटेल जवळ, गोडाऊन चौक ,खडीमशीन रोड मोशी ),किरण लोखंडे (33 शरद नगर ,स्पाईन रोड मोशी )अशी आरोपींची नावे आहेत .
अली शेर सुलतान अली (२५ राहणार दिल्ली दरबार हॉटेल ,महाळुंगे इंगळे )यांनी शनिवार 22 नोव्हेंबर रोजी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याबाबत महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

