दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने तरुणावर तलवारीने वार!

पिंपरी : पिंपरी येथे एका पान टपरी जवळ दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने पोलिसांना तक्रार करणार काय ,आम्ही इथले भाई आहोत असे म्हणत दोघांनी एका तरुणावर तलवारीने वार केल्याची घटना घडली .या प्रकरणात 33 वर्षीय तरुणाने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी पिंपरी पुलाखाली पान टपरी जवळ थांबले असताना आरोपी त्यांच्या जवळ आले. आरोपीने फिर्यादीचा शर्ट धरून शिवीगाळ करत आमच्याविरुद्ध पोलिसांना तक्रार करणार काय ,आम्ही इथले भाई आहोत ,तुला आज खल्लास करून दाखवून देऊ अशी धमकी दिली .त्यानंतर त्याने कमरेला लपवून ठेवलेली तलवार काढून फिर्यादीच्या छातीवर वार केला. फिर्यादीने वार चुकविण्याचा प्रयत्न केला असता तो वार त्याच्या डाव्या काखेजवळ लागून गंभीर दुखापत झाली. फिर्यादी खाली पडल्यावर आरोपीने तलवार हिसकावून पोटात तलवार खुपासण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आरोपींनी तलवार हवेत फिरवत ओरडून परिसरात दहशत पसरवून तेथून पळ काढला. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.

देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्या प्रकरणी एकास अटक!
पिंपरी : पिंपरी बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असे बाळगल्या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे .ही कारवाई अण्णासाहेब मगर स्टेडियम नेहरूनगर येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार विवेक गायकवाड यांनी संत तुकाराम नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
आरोपी शैलेश उर्फ सूच्या विजय कसबे (वय 32 गंज पेठ पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे .पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शैलेश याच्याकडून पोलिसांनी एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जीवंत काडतुसे अशी एकूण 51 हजार रुपये किमतीची शस्त्रे व जिवंत काडतुसे जप्त केली. संत तुकाराम नगर पोलीस तपास करत आहेत .

