शितल तेजवानीला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून पोलिसांकडून अटकेसाठी दिरंगाई!

अमेडिया कंपनीशी संबंधित वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरण
पुणे : अमेडिया कंपनीशी संबंधित वादग्रस्त जमीन व्यवहार प्रकरणात बावधन पोलिसांची भूमिका नेहमीच संशयात पद ठरली आहे .जमीन विक्रेती शितल तेजवानीला अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून पोलिसांकडून तिच्या अटकेसाठी दिरंगाई केली जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे .पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने पुण्यातील 40 एकर जागा 300 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली.

पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र सादर केले .मुद्रांक शुल्क बुडवण्याचा ठपका सरकारने ठेवला असून तो 21 कोटी रुपये आहे .हा जमीन व्यवहार रद्द करण्यासाठी 42 कोटी रुपये मेडिया कंपनीला भरावे लागणार आहेत .मात्र बावधन पोलीस याबाबत जमीन विक्रेती शितल तेजवानी यांच्या अटकेबाबत चालढकलपणा करत आहे.
याच बावधन पोलीस ठाण्याच्या अंतर्गत उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पदाधिकारी आणि वैष्णवी हगवणेचे सासरे राजेंद्र हगवणे हुंडाबळी प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यावेळीही अजित पवारांचे पदाधिकारी आणि वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे . दीर सुशील हगवणेला अटकके साठी टाळाटाळ केली .त्यावेळी पोलिसांवर जसा राजकीय दबाव होता ,तसाच दबाव आताही असणार अशी शंका व्यक्त केली जात आहे.
शितल तेजवानीला अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी पोलिसांकडून अटकेची दिरंगाई केली जात आहे असे सांगितले जात आहे. याच जमीन व्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती पुण्यातील आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली. 2021 चा शासन जीआर आहे ,त्यात कनिष्ठ वतनाच्या जमिनी हस्तांतरित करत असतील तर शासनाची परवानगी हवी .जो नजराणा आहे तो शासन निश्चित करणार. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी सीबीआय किंवा न्यायंत्रणांनी करावी अशी मागणी विजय कुंभार यांनी केली आहे .
.पुण्यातील मुंडवा व बोपोडी येथील जमीन घोटाळ्याची मास्टर माईंड शीतल तेजवानी सध्या फरार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे .शितल तेजवानी विरुद्ध दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून तिचा मोबाईल फोन बंद आहे .तसेच तिच्या राहत्या पत्त्यावर आढळून आलेली नाही .शितल तेजवानी आपल्या नवऱ्यासह घेऊ 300 कोटी घेऊन देशाबाहेर पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे.

