फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

किरकोळ वादातून तिघांकडून तरुणाला मारहाण!

किरकोळ वादातून तिघांकडून तरुणाला मारहाण!

पिंपरी : रूम पार्टनरच्या बायकोला धक्का दिल्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका तरुणाला तिघांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि ३१) रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास हिंजवडी, मुकाईनगर येथील रोणीत पीजी बिल्डिंग समोर घडली.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम बारकुजी सरोदे (वय ३०, मुकाईनगर हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रावाराम मंगलाराम देवासी, लाखाराम देवासी आणि एक अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावाराम याने फिर्यादी गौतम यांना बोलावून घेऊन त्याच्या बायकोला धक्का का दिला, अशी विचारणा केली. त्यानंतर रावाराम, त्याचा भाऊ लाखाराम आणि अनोळखी व्यक्तीने त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या पाठीवर, पायावर, डोक्याच्या पाठीमागे आणि मानेवर मारहाण करून त्यांना जखमी केले. पोलिस तपास करत आहेत.

viara vcc
viara vcc

तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक!
पिंपरी : तडीपार केलेल्या गुंडाला शिरगाव पोलिसांनी शस्त्रासह अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. २ )दुपारी पाचाणे गावाचे हद्दीत, पायबा मंदिराच्या बाजूला, प्रमिला जनरल स्टोअरजवळ करण्यात आली.

शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राकेश मधुकर रेणसे (वय ३५, पाचाणे, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस अंमलदार दिलीप राठोड यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संशयित राकेश रेणसे याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी एक वर्षाच्या कालावधीकरिता पिंपरी चिंचवड आयुक्तालय हद्दीतून तडीपार करण्यात आले होते. तडीपारीचे आदेश असतानाही, त्याने कोणतीही परवानगी न घेता हद्दीत वावरत असताना त्याला पकडण्यात आले. तसेच, त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात ३०० रुपये किमतीचा एक लोखंडी कोयता आढळून आला.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"