सेल्समनने केला १० लाख रुपयांच्या मालाचा अपहार!

पिंपरी : दुकानदाराच्या नावे माल देऊन दुकानदाराकडून ओटीपी घेत कंपनीची नऊ लाख ९० हजार २३० रुपयांची फसवणूक केली. ही घटना हिंजवडी येथील ‘हायवलुप ई-काडूमर्स प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनी घडली.

हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्लय्या विद्यानंद हिरेमठ (रा. सोलापुर), अक्षय जगत्त्राम झेंडे (रा. शिवाजी चौक, गणेश मंदिराजवळ हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे), अकील रज्जाक शेख (रा. लक्ष्मीनगर, पर्वती, पुणे), मंजुनाथ गिरमल्ला गौडगांव (रा. नागणसूर), चंद्रकांत रविंद्र उमाळे (रा. सुतारआळी, पिंपळे निलख) अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत. आण्णासाहेब पोपट देशमुख (वय ३९, रा. ईश्वर वठार, ता. पंढरपूर, जि. सोलापुर) यांनी गुरुवारी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना जुलै २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत घउली. संशयित हे कंपनीत सेल्समन म्हणून काम करत असताना त्यांनी आपसांत संगनमत करून दुकानदारांच्या मोबाइलवर आलेले डिलिव्हरी ओटीपी स्वतःकडे घेतले. दुकानदाराच्या नावाने पाठविलेला माल स्वतःकडे ठेवला. तो माल बाजारात विकून कंपनीच्या एकूण नऊ लाख ९० हजार २३० रुपयांचा अपहार केला.
अजमेरात घरफोडी प्रकरणी चोरट्यास अटक!
पिंपरी: अजमेरा कॉलनीतील एका सोसायटीत घराचे कुलूप तोडून चोरट्याने सुमारे १६ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २७ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली आहे. पोलिसांनी चोरट्याचा शोध घेत त्यास अटक केली आहे.
संत तुकारामनगर पिंपरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तोसिफ अब्दुल हसिफ चौधरी (वय २२, रा. माऊली फ्लोअर मिल, लालटोपीनगर, पिंपरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सागर दिलीप दड्डीकर (वय ३२, रा. मनोज अजमेरा सोसायटी, अजमेरा, पिंपरी) यांनी गुरुवारी संत तुकाराम नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दि. १६ ते २७ ऑक्टोबर २०२५ या कालखंडात सागर दड्डीकर व त्यांचा मित्र शिखर श्रीवास्तव हे मूळ गावी दिवाळीसाठी गेले होते. या कालावधीत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी घरातून १६ हजार ९५० रुपयांची त्यामध्ये घड्याळ, चांदीचे ब्रेसलेट, स्पीकर, गॉगल, परफ्युम, मोबाईल, ट्रिमर, मसाजगन असा मुद्देमाल चोरून नेला. दरम्यान घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. माहितीच्या आधारे आरोपी तोसिफ चौधरी याला अटक केली.

