पिंपरी चिंचवडला ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धा!

दिनांक ३ ते २७ नोव्हेंबरपर्यंत आयोजन
पिंपरी : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत आयोजित ६४ व्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी पिंपरी- चिंचवड शहरात होणार आहे. चिंचवड येथील रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे दि. ३ नोव्हेंबरपासून स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दि ३ ते २७ नोव्हेंबर या कालखंडात दररोज संध्याकाळी ७ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत. उदघाटन सोहळ्यास सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे उपस्थित राहणार आहेत.
संचालक बिभीषण चवरे म्हणाले, या स्पर्धेमध्ये एकूण २६ संघांचा सहभाग असून पिंपरी चिंचवड तसेच पुणे जिल्ह्यातील संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. राज्यनाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांना जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.’
या नाटकांचे होणार प्रयोग
या स्पर्धेमध्ये २८ नाटके सादर होणार आहेत. उद्घाटन सोहळ्यानंतर आमचे आम्ही पुणे यांच्या बुलेट एक हृदयस्पर्शी राईड या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. मंगळवारी अर्थ पुणे यांच्यावतीने कापूस कोंड्याची गोष्ट हा आणि त्यानंतर बुधवारी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखा यांच्यावतीने कठपुतली हा प्रयोग सादर होणार आहे.
गुरुवारी अविष्कार गार्डन गृहरचना संस्था पुणे यांचा स्लॅब हा नाट्यप्रयोग, शुक्रवारी बहुरंग पुणे यांचा गुलामी आणि बिनधास्त जिंदगी फाउंडेशनच्या वतीने शनिवारी समांतर हा नाट्य प्रयोग सादर होणार आहे.

