महिला पदाधिकाऱ्याचे भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यावर गंभीर आरोप!

पिंपरी : पिंपरी चिंचवड मधील भाजपच्या एका महिला पदाधिकाऱ्याने भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यावर गंभीर आरोप केल्याने पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आले आहेत .मोरे यांच्यासह आठ जणांविरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

भाजप युवा मोर्चाच्या चिटणीस तेजस्विनी कदम यांनी मोरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मला जीवे मारण्यासाठी मोरे यांनी त्यांच्या समर्थकांना पाठवले होते. तसेच पोलीस ठाण्यात पोलिसां देखत मला मारहाण केली असा आरोप तेजस्विनी कदम यांनी केला आहे. कदम यांनी तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे आशिष गावडे यांच्या घरी 26 ऑक्टोबर च्या दुपारी दोन वाजता गेले होते. त्यावेळी बंगल्याबाहेर प्रवीण यादव ,आशिष राऊत, गौरव गोळे, सागर घोरपडे ,जयेश मोरे सह पाच ते सहा महिला आणि पुरुष उभे होते .त्यांनी मला बंगल्याबाहेर पाहताच आमचा अनुप दादा इथे असताना तू का आलीस ,तू इथून निघून जा, आम्हाला अनुप दादांनी तुला मारून टाकायला सांगितले आहे. तुझे जगणं जगणे मुश्किल करू, अनुप दादा आम्हाला सांभाळून घेईल अशी मला धमकी दिली.
अनुप मोरे यांच्या कडून माझ्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे माझ्या निदर्शनास आल्याने मी पुन्हा माझा भाऊ आशिष गावडे यांच्या बंगल्यात गेले .तिथून मी चिंचवड पोलीस ठाण्यात आले. तिथेही महिला पोहोचल्या ,त्या ठिकाणी महिलांनी मला ठोशा-बुक्क्यांनी मारहाण केल्याचे तेजस्विनी कदम यांनी सांगितले. अनुप मोरे यांनी हे सर्व आरोप फेटाळले असून मी घटनास्थळी उपस्थित नव्हतो .माझी बदनामी करण्यासाठी हे खोटे आरोप केले जात आहेत असा दावा केला आहे. या वादामुळे भाजप युवा मोर्चा मधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.

