फक्त मुद्द्याचं!

22nd March 2026
पुणे

हिंजवडी, वाकड परिसरात हवा गुणवत्ता अति खराब !

हिंजवडी, वाकड परिसरात हवा गुणवत्ता अति खराब !

परी: सध्या सर्वाधिक गृहनिर्माण प्रकल्प हिंजवडी आयटी पार्क आणि वाकड भागात सुरू असल्याने तिथे हवा सर्वाधिक खराब आहे .याचा परिणाम या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना श्वसन विकाराचा धोका निर्माण झाला आहे .शिवाय दीपावलीनिमित्त फटाक्याची आतषबाजी मुळे हवेची गुणवत्ता आणखी खराब होण्याची शक्यता आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील हवा गुणवत्ता निर्देशांक रविवार 19 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता 305 वर पोहोचला होता .

vishnoi divali 2
vishnoi divali 2

वाकड मधील भुमकर चौकात ही नोंद करण्यात आली ही हवेची अति खराब पातळी मानली जाते .त्या खालोखाल पुण्यातील शिवाजीनगर येथील म्हाडा कॉलनी हवा गुणवत्ता निर्देशांक 244 वर नोंदवण्यात आला. पाषाण मधील पंचवटी 121, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 116 ,निगडी 108 आणि हडपसर 88 अशी हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद झाली. हडपसर परिसरातील हवेची गुणवत्ता समाधानकारक असून पाषाण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि निगडीतील हवेची गुणवत्ता मध्यम आहे .हिंजवडी आणि वाकड या परिसरात सर्वात खराब हवा गुणवत्ता नोंदवण्यात आली आहे .

आयटी पार्क हिंजवडी येथे अनेक मोठे गृहप्रकल्प सुरू असून येथील बांधकामामुळे धुळीचे कण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत .हिंजवडी परिसरात हवेचे गुणवत्ता सातत्याने खराब होत आहे .त्यामुळे स्थानिक नागरिकांसह विद्यार्थी आणि आयटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे .त्यातच दिपवाळीनिमित्त फटाक्यामुळे होणारे प्रदूषण आणि अनेक ठिकाणी जाळला जाणारा कचरा यामुळे प्रदूषणात वाढ झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ ,पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याबाबत तातडीने पावले उचलणे गरजेचे आहे. यासाठी गृह प्रकल्पांवर कारवाई देखील करणे आवश्यक आहे. गृहप्रकल्प राबवताना वायू प्रदूषणा संदर्भात दिलेल्या उपाययोजना बांधकाम व्यवसायिक करत नाहीत याचा हा परिणाम आहे .

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"