फक्त मुद्द्याचं!

23rd March 2026
पुणे

आयओनिक फॉरेस्‍ट’मध्‍ये 5 लाख वृक्षारोपणाचा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा!

आयओनिक फॉरेस्‍ट’मध्‍ये 5 लाख वृक्षारोपणाचा महत्त्वपूर्ण टप्पा साजरा!

डांगे चौक येथे 90.5 एकर जागेवर 10 लाख झाडे लावून पिंपरी-चिंचवडच्‍या हरित भूदृश्‍यामध्‍ये परिवर्तन घडविणार
पिंपरी : ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशन (एचएमआयएफ) या ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेडच्‍या सीएसआर शाखेने ‘ह्युंडाई आयओनिक फॉरेस्‍ट’ (IONIQ Forest) उपक्रमांतर्गत 5 लाख झाडांच्या यशस्‍वी वृक्षारोपणाची घोषणा केली. हा महत्त्वपूर्ण टप्पा येत्या वर्षभरात डांगे चौक, पिंपरी-चिंचवड येथे 90.5 एकर जमिनीवर 10 लाख झाडे (1 दशलक्ष) लागवडीच्या प्रकल्‍पाच्‍या उद्दिष्टाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्‍यामुळे महाराष्‍ट्र राज्‍यामधील हे सर्वात मोठे शहरी वृक्षारोपण असेल.

vishnoi divali 1
vishnoi divali 1

मावळ मतदारसंघाचे माननीय आमदार सुनील शेळके, विश्वजीत बारणे, पशुसंवर्धन विभाग – ताथवडे, पुणे सहाय्यक आयुक्‍त डॉ. रतिकांत नवटाके यांच्या सन्माननिय उपस्थितीत हा क्षण साजरा करण्यात आला. यावेळी जेओंगिक ली, फंक्शन हेड – कॉर्पोरेट अफेअर्स, एचएमआयएल, श्यामकुमार सिंग, फंक्शन लीड – प्रोडक्शन (पुणे) एचएमआयएल, पुनीत आनंद, एव्हीपी अँड व्हर्टिकल हेड – कॉर्पोरेट अफेअर्स, कॉर्पोरेट कम्‍युनिकेशन्‍स अँड सोशल एचएमआयएल, तसेच एचएमआयएल व ओरिअर्थ नेचर फाउंडेशनचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

5 जून 2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ‘मियावाकी’ पद्धतीचा वापर करून 1,000 वृक्षारोपणासह आयओनिक फॉरेस्‍ट उपक्रम सुरू करण्यात आला. ‘मियावाकी’ पद्धत ही दाट, जलद वाढणारी आणि जैवविविध वन निर्माण करण्यासाठी ओळखली जाते. या प्रकल्पात 41 स्थानिक वृक्ष प्रजातींचा वापर करण्‍यात आला आहे, ज्यामुळे पर्यावरण शाश्वतेची खात्री मिळेल आणि पक्षी, कीटक व इतर प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास निर्माण करून जैवविविधतेला चालना मिळेल.

हा उपक्रम लोकसहभागाशी अधिक जोडलेला आहे, ज्यामध्ये शाश्वत पर्यावरणीय पद्धतींवर लक्ष केंद्रित करण्‍यात आले असून, याचा नागरिक व पर्यावरण दोघांना फायदा होईल. पुढील पाच वर्षांमध्‍ये हे जंगल जवळपास 63,000 टन कार्बन डायऑक्‍साइड वायू शोषून घेण्‍याचा अंदाज आहे, ज्याचा पर्यावरण शाश्वतता आणि सर्वसमावेशक वाढीवर मोठा परिणाम होईल. या प्रकल्‍पाद्वारे आदिवासी समुदायांमधील 100 हून अधिक कुटुंबांसाठी हरित रोजगार उपलब्ध झाले आहेत, यासह इकोसिस्टीम पुनर्स्थापन, शाश्वत जमीन व्यवस्थापन आणि रेनवॉटर हार्वेस्टिंग व चेक डॅमच्या माध्‍यमातून जलसंवर्धनलाही चालना देण्यात आली आहे.

या उपक्रमाबाबत मत व्‍यक्‍त करताना मावळ मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके म्‍हणाले, ‘या उपक्रमातून पर्यावरण शाश्वततेशी संबंधित कॉर्पोरेट जबाबदारीचे महत्व अधोरेखित होते. मी या प्रयत्‍नामागील टीमचे अभिनंदन करतो आणि शाश्वत भविष्‍यासाठी अशा अधिकाधिक सहकार्यांसाठी त्यांना प्रोत्साहित करतो.’

या प्रसंगी बोलताना पुनीत आनंद, एव्हीपी अँड व्हर्टिकल हेड, कॉर्पोरेट अफेअर्स, कॉर्पोरेट कम्‍युनिकेशन्‍स अँड सोशल, एचएमआयएल म्‍हणाले, ”ह्युंडाई मोटर इंडिया लिमिटेड आयओनिक फॉरेस्‍ट उपक्रमाला चालना देत आहे, जो तामिळनाडू, हरियाणा, आंध्रप्रदेश नंतर सध्या महाराष्‍ट्रामध्‍ये राबवला जात असलेला देशव्‍यापी हरितीकरण व वनीकरणाचा प्रयत्‍न आहे. हा उपक्रम म्हणजे पर्यावरणासाठी आणि आम्‍ही सेवा देत असलेल्‍या समुदायांची परतफेड करण्‍याची आमची भावना आहे. या प्रकल्पामध्ये ‘मियावाकी’ पद्धतीच्‍या माध्‍यमातून आम्‍ही महाराष्‍ट्रात दाट, जैवविविधतेने वननिर्मिती करत आहोत, जे स्‍थानिक उदरनिर्वाहाला पाठिंबा देते, लोकसहभाग वाढवते आणि दीर्घकालीन शाश्वततेला चालना देते.’

हा उपक्रम पूर्णत्वास गेल्यानंतर, हे जंगल शैक्षणिक दौरे, पर्यावरण जागरूकता आणि कौशल्य विकास उपक्रमांसाठी स्थानिक शाळा व नागरिकांसाठी खुले करण्यात येईल. यामुळे भावी पिढ्यांमध्ये शाश्वततेची संस्कृती जोपासली जाईल.

हा उपक्रम ह्युंडाई मोटर इंडिया फाऊंडेशनच्‍या महाराष्‍ट्राप्रती असलेल्या व्यापक वचनबद्धतेचा भाग आहे, ज्यामध्ये 56 कोटी रूपये सीएसआर गुंतवणूक राज्‍याच्‍या विकास ध्‍येयांशी संलग्‍न आहे आणि पर्यावरण, आरोग्‍यसेवा, रस्‍ता सुरक्षा व समुदाय कल्‍याण यामधील प्रकल्‍पांना सहकार्य करत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"