कुसुमाकर शंकर जोशी यांचे अल्पशा आजाराने निधन!

पुणे : कुसुमाकर शंकर जोशी यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी रात्री 1.30 वाजता अंत्यसंस्कार वैकुंठ स्मशानभूमित करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, जावई नातवंडे असा परिवार आहे.

निगडी प्राधिकरण येथील जानकीबन सोसायटीचे ते अनेक वर्षे अध्यक्ष होते. तसेच अनेक वर्षे बजाज अॅटो कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत होते. सामाजिक कार्यातही त्यांचा मोठा सहभाग होता. दैनिक प्रभातमधील संगणक विभाग प्रमुख दिपक पवार यांचे ते सासरे होत.
दशक्रिया विधी : मंगळवार दि. 21 ऑक्टोबर 2025 रोजी
ओंकारेश्र्वर मंदीर,शनीवार पेठ ,पुणे येथे सकाळी 9 वाजता

