अहिल्यानगरच्या बनावट पत्त्यावर कुख्यात निलेश घायवळ याने मिळवला पासपोर्ट!

पुणे : पुण्यातील कुख्यात निलेश घायवळ याने अहिल्यानगर मधील बनावट पत्ता देऊन पासपोर्ट मिळवल्याची माहिती समोर आली आहे. परंतु त्याची पार्श्वभूमी न तपासता अहिल्यानगर पोलिसांनी त्याला पासपोर्टसाठी संमती दिलीच कशी असा प्रश्न उपस्थित होत आहे . निलेश घायवळ हा लंडनला पसार झाला असून बनावट पत्त्याद्वारे पासपोर्ट मिळवल्याचे उघड झाले आहे. पुण्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याने पासपोर्ट मिळविण्यास अडचण आली असती हे ओळखून त्याने पासपोर्ट मिळवण्यासाठी नगरमधील बनावट पत्त्याचा वापर केला.

अहिल्यानगर मधील कोतवाली पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गौरी घुमटानंदी बाजार, कोतवाली माळीवाडा, माळीवाडा रोड हा पत्ता त्याने पासपोर्ट मिळवण्यासाठी वापरल्याचे उघड झाले आहे, त्यामुळे नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यातील पोलिसांनी निलेश घायाळचा गुन्हेगारी इतिहास न तपासताच पासपोर्ट साठी संमती दिली . त्यामुळे आता नगर पोलीस वादात सापडू शकतात. पासपोर्ट मिळवण्यासाठी घायवळ याने कुणाचा वरदहस्त वापरला ,हा प्रश्न देखील भविष्यात पुढे येणार आहे .
कोथरूड मध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात कुख्यात गुंड निलेश घायवळ वर मकोका कायदे अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र तो लंडनला पळून गेल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले हत्या खंडणी अपहरण मारामारी यासारखे गंभीर गुन्हे नोंद असताना त्याला पासपोर्ट मिळाला कसा हे एक गुड आहे .

