मुजोर साखर आयुक्तांनी जाहीर माफी मागावी : अन्यथा उच्च न्यायालयात जाणार : विठ्ठल राजे पवार

साखर आयुक्त तावरे यांची हकालपट्टी करा, मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी : प्रभारी साखर आयुक्त दीपक तावरे यांच्या मुजोरी विरोधात मुख्यमंत्री, गृहमंत्री, संसदीय कार्यमंत्री, राज्याचे मुख्य सचिव यांच्याकडे शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटना महासंघाचे शिष्टमंडळ राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार आणि महासंघाच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. भारती चव्हाण ई मेल द्वारे केली तक्रार केली आहे. आयुक्त तावरे यांनी महिला पदाधिकाऱ्यांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात दप्तर दिरंगाई, कर्तव्यात कसूर, महिला सोबत अर्वाच्य आणि असंसदीय भाषेचा वापर केल्या प्रकरणी कायदेशीर तक्रार करून उच्च न्यायालयात देखील याचिका दाखल करू असा इशारा दिला आहे.

महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी गेल्या अनेक वर्षापासून गाळप झालेल्या उसाचे थकीत एफआरपी, रिकवरी बेस रेट, आरएसएफ फॉर्मुल्यानुसार अंतिम बिलांची रक्कम दिली नाही. तसेच पंढरपूरच्या एका साखर कारखान्यातील भ्रष्टाचाराच्या संदर्भात निवेदन देण्यासाठी पुण्यातील साखर आयुक्त कार्यालयात शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटना महासंघाचे शिष्टमंडळ राष्ट्रीय अध्यक्ष विठ्ठल राजे पवार आणि महासंघाच्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. भारती चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैठकीसाठी उपस्थित होते.
यावेळी प्रभारी साखर आयुक्त दीपक तावरे यांनी डॉ. भारती चव्हाण व इतर शेतकऱ्यांना असंसदीय व अपमानास्पद शब्द वापरून ‘तुमच्याशी बोलण्यासाठी मला वेळ नाही, ऑफीस मधून बाहेर जावा’ असे सांगितले, अश्या मुजोर अधिकाऱ्यांनी शेतकरी बंधू, भगिनींची व संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागू असा इशारा विठ्ठल राजे पवार आणि डॉ. भारती चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे दिला आहे.
सोलापूर, माळशिरस येथील संस्थेमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गैर व्यवहार झाला आहे. मनी लॉन्ड्रिंग व अनियमितता झाल्याने या संस्थेची चौकशी करण्यात यावी अशी मागणी शरद जोशी विचारमंच शेतकरी कामगार संघटना महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राष्ट्रीय निमंत्रक विठ्ठल राजे पवार यांनी शासनाकडे केली आहे.
साखर आयुक्त कार्यालयात शेतकऱ्यांचे प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. त्याचा जाब संस्थेच्या वतीने विचारण्यात आला. त्यामुळे प्रभारी साखर आयुक्तांचा तोल सुटला आणि त्यांनी महिला पदाधिकाऱ्यांवर एकेरी, अससंसदीय भाषा वापरली. याचा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत विरोध केला.
यावेळी संघटनेचे पुणे शहर जिल्हा युवा अध्यक्ष अनिल भांडवलकर, बाळासाहेब वर्पे पाटील संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते.

