आजच्या मुलांना शिक्षणाबरोबरच संस्काराची आवश्यकता : भाऊसाहेब भोईर

पिंपरी: आजच्या पिढीतील मुलांना शिक्षणाबरोबरच संस्कार आणि कला शिक्षणाची गरज आहे, मुलांच्या कलागुणांना वाव द्या, असे मत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी चिंचवड येथे व्यक्त केले.
बालरंगभूमी परिषद पुणे यांच्या वतीने गायन आणि चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. त्याच्या बक्षीस समारंभात भोईर बोलत होते. यावेळी गीतकार हरिदास कड, पुणे जिल्हा शाखेच्या अध्यक्षा दिपाली शेळके, प्रमुख सल्लागार हनुमंत कुबडे, उपाध्यक्ष अरुण पटवर्धन, नारायण करपे, कोषाध्यक्ष शंकरराव घोरपडे ,डॉ. प्रशांत पोफळे, गौरी लोंढे, विजय तांबे, प्रमोद पारधी, नामदेव पडदुणे, मनोज डाळिंबकर, राजू बंग उपस्थित होते.

भोईर म्हणाले, आत्ताची पिढी आपल्यापेक्षा हुशार असून त्यांना शिकवायला जाऊ नका. फक्त त्यांच्यावर योग्य आणि चांगले संस्कार करा.
यावेळी गायन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांनी आपली गायन कला सादर केली आणि चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांनी आणलेल्या चित्राचे प्रदर्शनही भरवण्यात आले. पुणे शाखेचे कोषाध्यक्ष शंकरराव घोरपडे यांनी आभार मानले.
स्पर्धेचा निकाल
गायन लहान गटात आशीर्वाद आपोतीकर, तनुजा साळुंखे, अंतरा बारवकर यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला आहे. तसेच श्रुतिका कदम, हेमलता जोगदंड, प्रांजल माळी, तनिष्क केदार, प्रांजल अर्निकर यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे. मोठ्या गटामध्ये ईशानी हिंगे, श्रावणी बोबडे, आराध्या गायकवाड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्याचबरोबर ऋषी क्षीरसागर, श्रावणी निंबाळकर, आर्या काळेबेरे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे. चित्रकला स्पर्धा लहान गटामध्ये शिवाली जंगम, अंश पाटील, अध्याय सोनवणे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्याचबरोबर राज साखरे, भवानी वराड, आर्या कुंभार, स्वरा माघाडे यांनी अनुक्रमे उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला आहे. मोठ्या गटामध्ये अजय रायकर, मिनीनाथ पवार, चैतन्य इंगळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवला आहे. त्याचबरोबर ज्ञानेश्वरी थोरात, समृद्धी राऊत, तनिष्का दिघे, सार्थक सिंह, अबोली जाधव, साईश गरुड, श्रावणी लव्हारे, वेदांत बारगजे, ऐश्वर्या कांबळे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक मिळवला आहे.

