फक्त मुद्द्याचं!

12th February 2026
गुन्हेगारी

दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक!

दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक!

 पिंपरी : दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना भोसरी पोलिसांनी अटक केली. लोखंडी कोयता आणि मिरची पावडर जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (१८ सप्टेंबर) रात्री भोसरीतील नवीन भोसरी हॉस्पिटलसमोर, बैलगाडा घाटाजवळ करण्यात आली.

viara vcc
viara vcc

कुणाल सचिन डाके (२२, गव्हाणे वस्ती, भोसरी), फैय्याजअली मोहंमद आली सय्यद (२०, आदर्शनगर, मोशी), गणेश नारायण भोसले (२१, लांडगे नगर, भोसरी), साहील विकास भिलारे (२०, शिवशंभो कॉलनी, सदगुरूनगर, भोसरी) आणि विजय विलास झेंडे (१९, शिवशंभो कॉलनी, सदगुरूनगर, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस हवालदार सचिन मोरे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी त्यांच्या कमरेला लोखंडी कोयता, खिशात मिरची पावडर आणि मास्क घेऊन थांबले होते. आरोपी धावडे वस्ती, भोसरी येथील एका ज्वेलर्स दुकानावर दरोडा घालण्याच्या तयारीत होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लाऊन पाच जणांना अटक केली. भोसरी पोलीस तपास करत आहेत.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"