फक्त मुद्द्याचं!

12th February 2026
पुणे

२५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस!

२५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस!

पुढील २४ तासांत मेघगर्जना, वीजांसह पावसाची शक्यता
पुणे पुढील २४ तासांत महाराष्ट्रात (पुणे, मुंबईसह) दुपार, संध्याकाळच्या सुमारास मेघगर्जना, वीजांसह पावसाची शक्यता आहे. (पिवळा इशारा). त्यानंतर पुढील २–३ दिवस पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे.. २२ सप्टेंबरपासून पुन्हा पिवळा इशारा लागू राहील. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार (ERF) २५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या आठवड्यात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

viara vcc
viara vcc

मध्यम श्रेणीच्या अंदाजानुसार (MRF model) बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या हवामान प्रणालीमुळे २६ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात अधिक पावसाची शक्यता दर्शवली आहे. सणासुदीच्या काळात नियोजन काळजीपूर्वक करा. नवरात्र , दुर्गापूजेदरम्यान पुणे, मुंबई तसेच राज्यात मेघगर्जना, वीजांसह मध्यम ते ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असल्याने आवश्यक ती काळजी घ्या.

खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 1263 क्युसेक वाढवुन रात्री 02.00 वा 2968 क्यूसेक* करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार बदल संभवू शकतो. अशी माहिती मुठा कालवे पाटबंधारे उपविभाग , उपविभागीयअभियंता मोहन .भदाणे यानी दिली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"