घायवळ टोळीतील चार जणांनी केला गोळीबार ; एक गभीर जखमी

पुणे शहरात गुन्हेगारी टोळ्यांचा वर्चस्वाठी प्रयत्न
पुणे कोथरूड परिसरात कुख्यात निलेश घायवळ टोळीतील चार जणांनी प्रकाश मधुकर धुमाळ (राहणार मूळ परभणी) याच्यावर दुचाकीवरून जाताना गोळीबार केला . या हल्ल्यात धुमाळ याला तीन गोळ्या लागल्या असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

गेल्या काही दिवसापासून पुणे शहरात टोळी युद्ध सुरू असून आपले वर्चस्व वाढवण्यासाठी डोळ्यांमध्ये स्पर्धा सुरू असल्याचे दिसून येत आहे .या गोळीबार प्रकरणी मुसा शेख, रोहित आखाडे ,गणेश राऊत आणि मयूर कुंभारे या चौघां विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे सर्व आरोपी निलेश घायाळ टोळीतील सराईत गुन्हेगार असून या पूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांचा समावेश आहे. जखमी प्रकाश धुमाळ हा मूळचा परभणी येथील असून तो पुण्यात एका कंपनीत नोकरीला आहे . बुधवारी रात्री तो आपल्या मित्रासोबत जेवणासाठी गेला होता. जेवण झाल्यानंतर मित्राला घरी सोडण्यासाठी जात असताना कोथरूड भागात टोळीतील चौघांनी अचानक पाठलाग करून त्याच्यावर पिस्तुलातून तीन गोळ्या झाडल्या . स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली, पोलिसांनी घटनास्थळी जाऊन धुमाळ याला रुग्णालयात दाखल केले. कोथरुड पोलिसांनी गुन्हेगारांना शोधण्याची मोहीम हाती घेतली असून तपासाठी पथके तयार केली आहेत.

