सुरक्षारक्षक महिलेवरती सहकारी कर्मचाऱ्याने केला लैंगिक अत्याचार!

वाकड येथील नामांकित मिलेनियम मॉलमध्ये घडला प्रकार
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरातील वाकड भागात असलेल्या एका नामांकित मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर एका खोलीत सुरक्षारक्षक महिलेवरती तिच्याच सहकारी कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा सर्व प्रकार वाकड येथील मिलेनियम मॉलमध्ये घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पीडित महिला तिच्या पतीसोबत एका खाजगी सुरक्षा कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करते. या सुरक्षा कंपनीचे वरिष्ठ अधिकारी असलेले मनोज धोंडीराम कदम (वय 45 ) या व्यक्तीने महिला काम करत असताना तिच्या सहकार्याला बाजूला करून तिला मिलेनियम मॉल च्या एका खोलीत घेऊन जात तुला कोणती पोस्टिंग पाहिजे अशी विचारणा केली .
त्यानंतर त्याने पीडित महिलेसोबत तिच्या इच्छेविरुद्ध अश्लील कृती केली . या महिलेने विरोध करत मनोज कदम याला मारहाण केली. मात्र त्याने विरोध जुगारून या महिलेवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

