बेकायदेशीर पिस्तुलातून गोळीबार; एक जण जखमी!

पिंपरी : बेकायदेशीरपणे बाळगलेले पिस्तूल हाताळताना अचानक ट्रिगर दाबल्याने गोळीबार झाल्याची घटना तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मींढेवाडी गावात घडली . या गोळीबारामुळे एक जण जखमी झाला आहे . पोलीस हवलदार शंकर पाटील यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे . त्यानुसार दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मोबाईलवर बोलत घरी जात असताना त्यांच्याकडे असलेले बेकायदेशीर पिस्तूल पहात होता . ट्रिगर मध्ये बोट घालून पिस्तूल गोल फिरवत असताना अचानक ट्रिगर दाबला गेला आणि यामुळे पिस्तुलातून गोळीबार झाला .या घटनेत एकाच्या हाताला गोळी लागली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव पुढील तपास करीत आहेत .

