फक्त मुद्द्याचं!

15th February 2026
गुन्हेगारी

मुंबई पुणे महामार्गावर अवैध 26 लाखाचा गुटखा जप्त!

मुंबई पुणे महामार्गावर अवैध 26 लाखाचा गुटखा जप्त!

अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाची कारवाई
पिंपरी : मुंबई पुणे महामार्गावर अन्न आणि औषध प्रशासनाने मोठी कारवाई करून अवैधरित्या 26 लाखाचा गुटखा घेऊन जाणाऱ्या ट्रकला पकडले आहे. हा गुटका कर्नाटकामधून मुंबईकडे जात होता .महाराष्ट्रात गुटखा बंदी असताना देखील मोठ्या प्रमाणात छुप्या पद्धतीने गुजरात आणि कर्नाटक राज्यातून गुटखा आणला जातो.

viara vcc
viara vcc

मुंबई पुणे महामार्गावर अवैद्यरित्या गुटखा घेऊन जाणार असल्याची गुप्त माहिती अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकाला मिळाली होती. संशयी ट्रक थांबून झडती घेण्यात आली. ट्रकमध्ये विविध कंपन्यांचा गुटखा आढळून आला आहे. त्याची किंमत सुमारे 26 लाख रुपये आहे .एवढ्या मोठ्या रकमेचा गुटखा अनन्यामागे मोठी टोळी असण्याचा संशय अन्न आणि प्रशासनाने व्यक्त केला आहे .एफडीने या प्रकरणी तातडीने नोंद घेतली असून संबंधित व्यक्तीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासना चे म्हणणे आहे की अशा प्रकारच्या अवैध पदार्थाच्या वाहतुकीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. बाजारात साखळी पद्धतीने गुटख्याचे वाटप करण्यापूर्वीच त्यावर कडक कारवाई केली जाईल.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"