चर्होली बुर्डे वस्ती जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा ; 34 लाखांचा मुद्देमाल जप्त!

पिंपरी : दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत खंडणी विरोधी पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकून 33 जणांवर गुन्हा दाखल केला आहे . यामध्ये काही सराईत गुन्हेगारांचा देखील समावेश आहे . तसेच राजकीय नेत्यांचे कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे . ही कारवाई शनिवार 30 ऑगस्ट रोजी रात्री करण्यात आली.

दिघी पोलिसांनी या प्रकरणात आत्तापर्यंत 27 जणांना बेड्या ठोकले आहेत . इतर अन्य आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत . या प्रकरणांमध्ये गणेश विठ्ठल लांडगे या सराईत गुन्हेगाराचा देखील समावेश आहे. पोलिसांच्या छाप्यात 34 लाख 14 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चर्होली बुर्डे वस्ती रासकर नावाच्या व्यक्तीच्या खोलीमध्ये केतन जोरे हा जुगार अड्डा चालवत होता . यांबाबतची माहिती खंडणी विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार रात्री उशिरा खंडणी विरोधी पथकाने चर्होली येथील बुर्डे वस्ती येथे जुगार सुरू असलेल्या खोलीवर छापा टाकून त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या 33 जणांवर गुन्हा दाखल केला . याबाबत पोलीस शिपाई दादाभाऊ नंदाराम साबळे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .
चाकण मध्ये महिला वाहतूक पोलिसाला ठोकरले!
पिंपरी : चाकण येथे वाहतूक नियमन करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला मोटर चालकाने धडक देऊन पळ काढला. वाहनावर थकीत असलेला दंड भरण्यास सांगितल्याने चालकाने वाहतूक पोलिसांना शिवीगाळ करून धमकी दिली . ही घटना शनिवार 30 ऑगस्ट रोजी आळंदी ते चाकण रोडवरील सिग्नल जवळ घडली . देवयानी सोनवणे असे जखमी पोलीस महिलेचे नाव असून त्यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी त्यांच्या सहकार्यासोबत मेदनकरवाडी गावच्या हद्दीत वाहतूक नियमन करत होत्या. त्यावेळी सिग्नल वर थांबलेल्या एका मोटारीची तपासणी केली. या मोटारीवर 62 हजार रुपयांचा दंड थकीत असल्याचे दिसून आले. फिर्यादीने चालकाला वाहन परवाना विचारल्यावर त्याने अरेरावेची भाषा करत माझ्याकडे परवाना नाही काय करायचे ते करा असे म्हटले . फिर्यादीने मोटार बाजूला घ्यायला सांगितल्यावर दंडापासून वाचण्यासाठी त्याने शिवीगाळ केली ,आणि मोटार पुढे घेतली. मोटार थांबवण्याच्या प्रयत्न करत असताना फिर्यादीच्या डाव्या हाताच्या बोटाला खरचटले आणि उजव्या हाताला धक्का बसला. आरोपीने सरकारी कामात अडथळा निर्माण करून पळ काढला चाकण पोलीस याबाबत तपास करीत आहे .