फक्त मुद्द्याचं!

11th February 2026
महाराष्ट्र

महाराष्ट्रात पावसाची तुफान बॅटिंग ; हवामान विभागाचा अंदाज!

महाराष्ट्रात पावसाची तुफान बॅटिंग ; हवामान विभागाचा अंदाज!

मुंबई : राज्यात पावसाचा जोर वाढला असून हवामान विभागाने पुढील पाच दिवसांसाठी अंदाज जारी केला आहे . मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी सह सात जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज असून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 18 ते 20 ऑगस्ट दरम्यान या जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता आहे. कोकण आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाने पूरस्थिती निर्माण झाली असून मोठे नुकसान झाले आहे .तसेच आज प्रादेशिक हवामान खात्याने पुढील पाच दिवसासाठी मुंबई सह राज्यातील सात जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

viara vcc
viara vcc

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील मुंबई, ठाणे ,रायगड, रत्नागिरी, पुणे जिल्ह्यातील घाट परिसर ,सातारा जिल्ह्यातील घाट परिसर, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसर या भागात अति मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे .18 ते 20 ऑगस्ट दरम्यान पालघर आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता आहे. 21 ऑगस्ट पासून पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे .मात्र अमरावती जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्‍यता असून हवामान विभागाने जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला आहे

नांदेड जिल्ह्यात आज पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे .मुखेड तालुक्यात आज पहाटे झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक गावात हाका रोड आला आहे भिंगोली ,भेंडेगाव ,हसनाळ ,रावणगाव, भासवाडी सांगवी, या सह परिसरात अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे .मुखेड मधील तीन गावात 100 हून अधिक लोक अडकल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली .तर पावसामुळे नांदेडमध्ये चार ते पाच जण दगावल्याची माहिती समोर येत आहे. तसेच लातूर सह संपूर्ण मराठवाड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे .नांदेड जिल्ह्यातील पूरस्थिती अधिकच गंभीर होत असून लेंडी नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाल्याने पुनर्वशीत रावणगाव ,भासवाडी ,भिंगेली आणि हसनाळ या गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. एन डी आर एफ पथकाकडून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे .नांदेडमध्ये गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून जुन्या नांदेड शहरातील पुलाला पाणी टेकले आहे .विष्णुपुरी धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले असून 64,412 क्युसेसने विसर्ग सुरू आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"