फक्त मुद्द्याचं!

1st December 2025
पुणे

पीएमआरडीएच्या ४ टीपी स्कीमला मिळाली मंजुरी!

पीएमआरडीएच्या ४ टीपी स्कीमला मिळाली मंजुरी!

व‍िकास प्रक्रियेला म‍िळणार गती; पुढील नियोजनावर देणार भर
पिंपरी : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) तयार केलेल्या प्राथम‍िक टिपी स्कीमला (नगर रचना योजना) शासनाकडून मान्यता मिळाली आहे. या निर्णयामुळे पीएमआरडीए क्षेत्रातील संबंधित गावालगतच्या विकास कामांना गती मिळणार असून त्या दृष्टीने पुढील नियोजन करण्यात येत आहे. ५ टीपी स्कीम मंजूर झाल्याने सुमारे ६.८ कि.मी लांबीचा रिंगरोड विकसित करता येणार आहे.

पीएमआरडीए हद्दीतील रिंगरोड संपाद‍ित होवून नियोजनबद्ध विकास कामांना गती मिळावी, या उद्देशाने टिपी स्कीम (नगर रचना योजना) राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यास शासनाने नुकतीच अंतिम मान्यता दिली असून पीएमआरडीए हद्दीतील ४ टीपी स्कीमला हिरवा कंदील मिळाला आहे. त्यात वडाचीवाडी, औताडे – हांडेवाडी आणि होळकरवाडीसाठी २ अशा ४ योजनांना शासनाने अंतिम मान्यता दिली आहे. यासह पुणे महानगरपालिका हद्दीतील फुरसुंगीमधील योजनेचा पण समावेश आहे.

viara vcc
viara vcc

शासनाकडून मंजुरी मिळालेल्या टिपी स्कीमबाबत तातडीने पुढील प्रक्रिया पीएमआरडीएकडून करण्यात येत आहे. यासाठी संबंधितांशी चर्चा करून रस्ता ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने मार्ग मोकळा झाला आहे. यासह नव्याने प्रस्तावित केलेल्या १५ योजनांसाठी देखील जाहीर सूचना देण्यात आली आहे. याबाबत संबंधित लोकप्रतिनिधी, नागरिक आणि शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन आराखडे निश्चित करण्यात येणार आहे.

या गावातील नव्या योजनांसाठी जाहीर सूचना
पीएमआरडीएअंतर्गत ६५ मीटर रुंद वळण रस्त्याचे क्षेत्र मिळण्यासाठी एकूण १५ टिपी स्कीम (नगर रचना योजना) घोषित करण्याबाबत जाहीर सूचना देण्यात आली आहे. त्यात वाघोली, आव्हाळवाडी, मांजरी खुर्द १, मांजरी खुर्द २, मांजरी खुर्द ३, वडकी (ता. हवेली), माण (मुळशी), धामणे, धामणे, गोदुंबरे, दारुंबरे/ साळुंब्रे १, दारुंबरे/ साळुंब्रे २, सांगवडे (ता. मावळ), नेरे, बावधन बु. (ता. मुळशी) या गावातील योजनांचा समावेश आहे.

टीपी स्कीमला मंजुरी मिळाल्यामुळे विकास प्रक्रियेला गती येईल. यासह नव्याने प्रस्तावित केलेल्या १५ योजनांबाबत स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी, शेतकऱ्यांशी चर्चा करूनच पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे गावनिहाय बैठका घेऊन शेतकऱ्यांची बाजू समजून घेत त्यांच्या सूचनांचा विचारात घेवून पुढील आराखडे तयार करण्यात येतील. – डॉ. योगेश म्हसे, महानगर आयुक्त, पीएमआरडीए

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"