साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल पुरोहितसह सात जणांची पुराव्याअभावी निर्दोष सुटका!

मालेगाव बॉम्बस्फोट बहुप्रतिक्षित खटल्याचा निकाल
मुंबई : मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित बहुप्रतिक्षित खटल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणा एन आय ए कायद्या अंतर्गत स्थापन विशेष न्यायालय गुरुवारी ( 31 जुलै) निकाल दिला .हा निकाल देताना विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह मेजर रमेश उपाध्याय निवृत्त, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी ,सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांची पुराव्या अभावी निर्दोष सुटका करण्यात आली .

बॉम्बस्फोट मोटर सायकल मध्ये झाला हे सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला अपयश आले. आरडीएक्स प्रसाद पुरोहितने आणले हे सिद्ध होऊ शकलेले नाही .ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, त्या ठिकाणाहून वैज्ञानिक पुरावे जमा केले गेले नाहीत. साध्वीच्या मोटरसायकलचा स्फोट झाल्याचा आरोप आहे ,पण ही मोटर सायकल तिच्या मालकीची असल्याचे सिद्ध करण्यात अपयश आल्याचे न्यायालयाने आरोपींची सुटका करताना स्पष्ट केले आहे. ऑक्टोबर 2018 मध्ये विशेष एन. आय. ए .न्यायालयाने आरोपींवर दहशतवादाच्या आरोपाअंतर्गत आरोप निश्चिती केली, आणि खटल्याच्या नियमित सुनावणीला सुरुवात झाली. सात वर्षाच्या सुनावणीनंतर 19 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी आणि आरोपींचा युक्तिवाद पूर्ण झाल्याचे जाहीर करून खटल्याचा निर्णय राखून ठेवला होता .
याप्रकरणी विशेष न्यायालयाने आज गुरुवारी निकाल दिला. खटला सुरू असताना प्रकरणातील सगळ्या आरोपींना उच्च तसेच सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता .आरोपी विरोधात यु ए पी ए कलम 16 (दहशतवादी कृत करणे) आणि अठरा दहशत वादी कृत्यांचा कट रचने, 120 ब गुन्हेगारी कट, 302 खून ,307 खून करण्याचा प्रयत्न, 324 स्वेच्छेने दुखापत करणे ,153 अ दोन धार्मिक गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे आदी भारतीय दंड विधानाच्या विविध कलमांतर्गत खटला चालवण्यात आला. साक्षीदारांचा मृत्यू संदर्भात दीर्घकाळ चाललेल्या खटल्यापैकी हा एक खटला आहे .
विशेष न्यायालयाने साध्वी प्रज्ञासिंग आणि पुरोहित यांच्यासह प्रकरणातील आरोपींवर बेकायदा कारवाया. प्रतिबंधक कायदा. भारतीय दंड विधान आणि शस्त्रास्त्र कायदा अशा महत्त्वाच्या कायद्याअंतर्गत दहशतवादाच्या आरोपा प्रकरणी खटला चालवला. खटल्यात एन आय ए तर्फे 323 साक्षीदारांचे साक्षी पुरावे नोंदविण्यात आले .तर आरोप पत्रात उल्लेख असलेल्या जवळपास 30 हून अधिक साक्षीदारांची साक्ष देण्यापूर्वीच मृत्यू झाला. याशिवाय त्यापैकी 34 साक्षीदार फितूर झाले. हे साक्षीदार पुरोहित आणि कथित कट रचण्याच्या बैठकांशी संबंधित होते. मोटर सायकल मध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन 6 जण ठार आणि शंभरहून अधिक लोक जखमी झाले होते.

