फक्त मुद्द्याचं!

4th February 2026
गुन्हेगारी

वाकडला जमिनीच्या वादातून तोडफोड आणि चोरी!

वाकडला जमिनीच्या वादातून तोडफोड आणि चोरी!

कागदपत्रे आणि रोख रक्कम चोरल्याचा प्रकार उघड

पिंपरी: जमिनीच्या वादातून गाड्यांची तोडफोड करून कागदपत्रे आणि रोख रक्कम चोरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना ३० मे २०२५ रोजी वाकड रोडवरील माऊली चौकात दुपारी घडली.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी विशाल उर्फ साकी संजय गायकवाड (३७, वाकड) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निलेश शंकर वाघमारे आणि त्याच्या ५ बॉडीगार्डच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

viara vcc
viara vcc

आरोपीचे पाच बॉडीगार्ड फिर्यादीच्या घराजवळ आले आणि त्यांनी फिर्यादीला मोकळ्या जागेत त्यांच्या गाड्या न लावण्यास सांगितले. “ही तुझ्या बापाची जागा नाही, सर्व गाड्या काढून टाक नाहीतर आम्ही तुझ्या सर्व गाड्या फोडून टाकू. तसेच तुझ्या कुटुंबाला या जागेतून घेऊन जा आणि जागा खाली कर नाहीतर तुला मारून टाकू”, अशी धमकी दिली. त्याच दिवशी सायंकाळी आरोपी आणि त्याचे ५ अंगरक्षक, ज्यात २ महिला आणि ३ पुरुष होते, त्यांनी फिर्यादीच्या ताब्यात असलेल्या सर्व्हे नं १६९/४ जमिनीमध्ये प्रवेश केला. त्यांनी फिर्यादीच्या मालकीचा वॉटर टँकर (एमएच १२/एफसी ६३१७) आणि एक ट्रक (एमएच १२/केपी १६७७) ची तोडफोड केली आणि टायरची हवा सोडून दिली. तसेच, ट्रकच्या क्लीनर बाजूच्या दरवाजाची काच फोडून आत प्रवेश केला आणि फिर्यादीच्या संमतीशिवाय त्यातील १४ हजार ५०० रुपये, गाडीची कागदपत्रे, चलनबुक, बिल बुक चोरून नेली.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"