पिंपरी : बांधकाम व्यवसायिक कंपनीत काम करणार्या एका कर्मचार्याने कंपनीची २४ लाख ५५ हजार रुपयांची फसवणूक केली. ही घटना २०२३ ते डिसेंबर २०२४ या कालावधीत अॅशडॅन व्हीटीपी डेव्हलपर्स या कंपनीत घडली.
सौरभ सुनील शिंदे (रा. मार्वेâटयार्ड, पुणे) आणि इतर साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र वाघू तुपे (वय ४९, रा. आंबेगाव बुद्रुक) यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आरोपी सौरभ शिंदे हा फिर्यादी यांच्या अॅशडॅन व्हीटीपी डेव्हलपर्स या कंपनीत काम करत होता. कंपनीकडून सदनिका धारकांना सदनिकांचा ताबा देण्यास उशीर झाला. त्यामुळे महारेरा कायद्यानुसार कंपनीकडून सदनिका धारकांना द्यावयाची व्याजाच्या स्वरूपात देय रक्कम आरोपीने स्वत:कडे घेतली. तसेच,सदनिका धारकांनी मागणी केलेली कामे करून देण्यासाठी कंपनीचे साहित्य, लेबर वापरून सदनिका धारकांकडून विविध बँक खात्यावर पैसे घेतले. त्यानंतर ते पैसे आरोपीने स्वत:च्या खात्यावर घेत कंपनीची २४ लाख ५५ हजार ५१८ रुपयांची फसवणूक केली. फौजदार जाधव तपास करीत आहेत.
हिंजवडी येथे दोघांवर चाकूने वार
पिंपरी : तुझी मावशी कुठे आहे, असे विचारत एकाने दोन तरुणांवर चाकूने वार केले. ही घटना गुरुवारी (दि. १२) रात्री हिंजवडीतील गवारेवस्ती येथे घडली. अंकज प्रदीपराव तायडे (वय २९), पंकज प्रदीपराव तायडे (वय ३२, रा. गवारेवस्ती, हिंजवडी) अशी जखमींची नावे आहेत. अंकज तायडे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. निखिल (वय ३८, रा. यवतमाळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी निखिल गुरुवारी रात्री तायडे यांच्या घरी आला. त्याने तायडे यांच्या मावशीबद्दल विचारत अंकज यांच्यावर चाकूने वार केले. अंकज तायडे ओरडत असताना त्यांचा भाऊ पंकज तायडे घराबाहेर आला. त्यावेळी आरोपीने त्यांच्यावर देखील चाकूने वार करून गंभीरजखमी केले. त्यानंतर आरोपी पळून गेला.