फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
पुणे

शालेय बस चालकांची नियमित होणार मद्यपान आणि औषध चाचणी!

शालेय बस चालकांची नियमित होणार मद्यपान आणि औषध चाचणी!

पुणे : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने शालेय बस वाहतुकी संदर्भात नवीन कडक नियम लागू केले आहेत .मागील शैक्षणिक वर्षात घडलेल्या काही दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदा शाळा सुरू होण्यापूर्वीच खबरदारीचे उपाय योजण्यात आले आहेत . या नियमांतर्गत शालेय बस चालकांची पार्श्वभूमी कसून तपासली जाणार आहे . त्यांची नियमित मद्यपान आणि औषध चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे .

viarasmall
viarasmall

मागील वर्षी काही शिक्षण संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना शाळेतील शिपाई आणि बस चालकांकडून गैरवर्तणूक केली गेली यामुळे पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता . पालकांनी या गोष्टींवर नियंत्रण आणण्यासाठी शिक्षण विभागावर दबाव टाकला .आमची मुलं सुरक्षित राहिली पाहिजेत याची हमी संबंधित शाळांनी द्यावी अशी मागणी देखील करण्यात आली होती . त्यामुळे यंदा शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी कडक पावले उचलली आहेत . त्यानुसार बस चालक आणि सफाई कामगार व महिला सेविकांची सकाळी व सायंकाळी दोन वेळा मद्यपान व औषध चाचणी करणे अनिवार्य केले आहे . या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे अशा सूचना सर्व शाळांना देण्यात आले आहेत .या नवीन नियमामुळे शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होईल आणि अनुचित प्रकारांना आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"