गुटखा विक्री करणारा गजाआड!

पिंपरी : शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा साठवून विक्रीस ठेवणार्या तरुणाला चिखली पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी सकाळी चिखलीतील मोरेवस्ती येथे करण्यात आली.
रितेश सतिश कानवटे (वय १९, रा. मोरेवस्ती, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. अखिल पोपट मुलाणी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार किरण जाधव यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी रितेश कानवटे याच्याकडे १६ हजार २८० किंमतीचा गुटखा साठवलेला आढळून आला. हा गुटखा विक्रीस ठेवला होता. आरोपी मुलानी याच्याकडून आरोपीने गुटखा आणला होता. फौजदार विकास पंचमुख तपास करीत आहेत.

खाऊ-पिऊ घालत नसल्याने बिल्डरच्या कारची सराईत गुंडांकडून तोडफोड!
पिंपरी, : तुमचा मालक आम्हाला खाऊ-पिऊ घालत नाही, असे म्हणत तिघा सराईत गुंंडांनी बिल्डरच्या ऑफिससमोर उभ्या केलेल्या स्कॉर्पिओ कारची सिमेंट ब्लॉकने तोडफोड केली. ऑफीसमधील कामगारांना
शिवीगाळ, धमकी देत जबरी चोरीचा प्रयत्न केला. याप्रकरणी सांगवी पोलीसांनीएकाला गजाआड केले असून दोघे पसार आहेत. ही घटना ६ जून आणि ८ जून रोजी पिंपळे गुरव येथे घडली.
विघ्नेश गुणशिलन रंगम (दोघे रा. गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव) याला पोलिसांनी अटक केली आहे. व्यंकटेश राजेंद्र भोसले, अनिकेत उरणकर उर्फ उन्या अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तिघे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. बांधकाम व्यावसायिक मनिष गोविंद राठी (वय ४३, रा. गंगोत्रीनगर, पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी कुटुंबासह नांदेड येथे बहिणीकडे गेले असताना आरोपी रंगम याने त्यांच्या ऑफिससमोर पार्क केलेल्या स्कॉर्पिओ कारची सिमेंट ब्लॉकने तोडफोड केली.
कामगारांना धमकावत, तुमचा मालक आमच्याकडे पाहत नाही, आम्हाला खाऊ-पिऊ घालत नाही, असे म्हणत तिघांनी मिळून शिवीगाळ केली. दोन दिवसांनी ऑफिसमध्ये घुसून जबरदस्तीने चोरीचा प्रयत्न केला. तसेच, आम्ही या ठिकाणचे भाई आहोत. तुला व तुझ्या घरातील लोकांंना जिवंत सोडणार नाही, अशी धमकीदेत परिसरात मोठा आरडाओरडा करत दहशत निर्माण केली. सहायक पोलीस निरीक्षक नारायण पाटील तपास करीत आहेत.