राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना सात दिवसानंतर अटक!

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण
पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी आज पहाटे सासरा राजेंद्र आणि दीर सुशील हगवणे यांना अटक केली आहे ही अटक उशिरा झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणीच फिरत असताना पोलिसांना का सापडले नाहीत याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
वैष्णवी चे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे गेली सात दिवस फरार होते. आज पहाटे साडेचार वाजता या दोघांना बावधन पोलिसांनी अटक केली . यापूर्वी वैष्णवीचा नवरा शशांक ,नणंद करिष्मा, आणि सासू लता हगवणे यांनाही अटक झाली आहे .राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे पुणे आणि आसपासच्या परिसरात सात दिवसापासून फिरत होते. फिरताना रोज आपल्या गाड्या बदलत होते .17 मे रोजी औंध येथील रुग्णालयात सासरे राजेंद्र हे वैष्णवी यांचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले होते .परंतु नागरिकांच्या विरोधामुळे त्यांना ते शक्य झाले नाही.

त्यानंतर मुहूर्त लॉन्स थार गाडीने वडगाव मावळ, पवना डॅम फार्म हाऊस, आळंदी येथे लॉजवर, 18 मे रोजी वडगाव मावळ ,पवना डॅम बंडू फाटक कडे बोलोरो गाडीने ,19 मे पुसेगाव सातारा अमोल जाधव यांच्या शेतावर , 20 मे पसरणी मार्गे कोगनोळी हॉटेल हेरिटेज, 21 मे कोगनोळी प्रीतम पाटील या मित्रांच्या शेतावर, 22 मे रोजी पुण्याला परत. या सात दिवसांमध्ये हगवणे यांनी आपल्याला अटक होऊ नये म्हणून राजकीय आश्रय घेण्याचा देखील प्रयत्न केला आहे .मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीच त्यांना पक्षातून हकल्यामुळे ते स्वतःहून पुण्यात परत आल्याचे समजते .राजेंद्र आणि सुशील हगवणे यांना सात दिवसानंतर अटक वैष्णवी हगवणे प्रकरण