आयएसआयएसशी संबंधित दोघांना अटक!

मुंबई : पुण्यातील 2023 च्या आयडी प्रकरणात दोन फरार आरोपींना मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एनआयएने अटक केली आहे. हे दोघेही बंदी घातलेल्या आयएसआयएस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉडेल चे सदस्य आहेत .अब्दुल्ला फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तन्ह्या खान अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत .काही महिन्यापूर्वीच एनआयएने अब्दुल्ला शेख उर्फ डायपर वाला आणि तन्ह्याखान या दोघां विरोधात अजामीन पत्र अटक वॉरंट जारी केले होते .
दोन्ही आरोपींची ठोस माहिती देणाऱ्यास तीन लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते .पुण्यातील 2023 च्या आयडी प्रकरणात याआधीच एनआयएने आयएसआयएसशी संबंधित आठ जणांना अटक केली आहे. हे आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत .अटकेतील सर्व आरोपींवर देशात शांतता आणि सामाजिक सलोखा बिघडवण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप ठेवला आहे. हिंसाचार व दहशतीच्या मार्गाने भारत सरकार विरोधात युद्ध पुकारून देशात इस्लामिक राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला असा ही आरोप आरोपींवर आहे .

अब्दुल्ला भैय्या शेख यांनी पुण्यातील कोंढवा भागात भाड्याने घेतलेल्या घरात स्फोटके तयार केली होती. ही स्फोटके तयार करण्यासाठी त्याने 2022- 23 मध्ये प्रशिक्षण घेतले होते .पुण्यात तयार केलेल्या स्फोटकांची फैयाज शेख याने चाचणी ही केली होती. एन आय एने मोहम्मद इमरान खान, मोहम्मद युनूस साकी ,अब्दुल कादिर पठाण, सिमाब नसिरुद्दीन काजी, झुल्फिकार आली बारूदवाला ,शामिल नाचन ,अकिब नाचन ,शहनवाज आलमया या आरोपी विरुद्ध युएपीए स्फोटके अधिनियम, शस्त्र अधिनियम आणि भारतीय दंडविधानाच्या विविध कलमानुसार आरोपपत्र दाखल केले आहे.
अब्दुल फैयाज शेख उर्फ डायपरवाला आणि तन्ह्या खान हे दोघे इंडोनेशियातील जकार्ता मध्ये अनेक महिन्यापासून लपले होते, तिथून भारतात परतताच त्यांना विमानतळावरून अटक करण्यात आली.