वाल्हेकरवाडीतील तरुणी कोमल जाधव हत्याप्रकरणी शेजाऱ्याला अटक !

चिंचवड : वाल्हेकर वाडी परिसरात एका अठरा वर्षे तरुणीची रविवारी हत्या करण्यात आली. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत ,आरोपीला 24 तासात जेरबंद करण्यात आले आहे. मृत तरुणीच्या शेजारी राहणाऱ्यानेच तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
कोमल भरत जाधव (वय 18) या तरुणीची रविवार दिनांक 11 रोजी रात्री हत्या करण्यात आली होती .कोमल जाधव ही कुटुंबासोबत वाल्हेकरवाडी येथे राहत होती. रात्री ती घरी असताना दुचाकी वरून दोन जण आले, तिला घराबाहेर बोलावून आरोपींनी तिच्यावर धारदार शस्त्राने वार केले, यात तिचा मृत्यू झाला .हत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून तपास केला .

कोमल जाधवच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या 45 वर्षीय उदयभान यादव (मुख्य आरोपी) आणि त्याचा सख्खा भाचा रणवीजय यादव (वय 21 राहणार सादिक पूर आंबेडकर नगर उत्तर प्रदेश सध्या वास्तव्य वालेकर वाडी )अशा दोघांना अटक केली. पोलिसांच्या तपासात अशी माहिती समोर आली की मयत कोमल जाधव आणि आरोपी हे शेजारी राहत होते, त्या दोघांमध्ये आर्थिक व्यवहारही झाले होते. त्यातूनच दोघांमध्ये वाद निर्माण झाला. त्यानंतर आरोपीने भाच्याच्या मदतीने कोमलची हत्या केली .