फक्त मुद्द्याचं!

12th February 2026
देश विदेश

लष्कर एक तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा!

लष्कर एक तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा!

पहेलगाम हल्ल्यातील एक दहशतवादी ठार
जम्मू काश्मीर: जम्मू काश्मीरच्या सोफियान जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यास भारतीय सैन्यांना यश मिळाले असून या दहशतवाद्यांपैकी एकाचा बेलगाम हल्ल्यात समावेश असल्याचे म्हटले जात आहे.

जम्मू काश्मीरमध्ये सोपियांच्या जंगलात मंगळवारी सकाळी काही दहशतवादी दिसून आले होते .दहशतवादी दृष्टीस पडतात भारतीय लष्कराने या परिसराला वेढा घालून शोध मोहीम सुरू केली. दहशतवादी आणि भारतीय सैन्य यांच्यामध्ये चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. हे दहशतवादी लष्कर ए तोयबा या संघटनेचे असल्याचे सांगण्यात येते.

viarasmall
viarasmall

सोफिया जिल्ह्यातील शुकूरच्या जंगलात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती शोध पथकाला मिळाली. भारतीय सैन्याने या परिसराला परिसराला वेढा घालून कारवाईला सुरुवात केली . पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या शहीद अहमद कुट्टे हा दहशतवादी ठार झाला असल्याचे समजते.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"