विराट कोहलीचा कसोटी क्रिकेटला रामराम!

मुंबई: भारतीय क्रिकेटचा रण मशीन विराट कोहली याने आपल्या इंस्टाग्रावर भावनिक पोस्ट करत कसोटी क्रिकेट मधून 14 वर्षानंतर निवृत्ती जाहीर केली. गेल्या काही महिन्यांपासून विराट कोहली कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर करणार अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होती .पाच दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेट कर्णधार रोहित शर्मा याने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली. रोहित शर्मा ने निवृत्ती जाहीर केल्यानंतर अवघ्या पाच दिवसात विराट कोहली याने देखील कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती जाहीर केली आहे.या निवृत्ती मुळे क्रिकेट प्रेमींना दुःखद आश्चर्य वाटले आहे .
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाला याची कुणकुण लागल्याने त्यांनी कसोटी क्रिकेट मधून इंग्लंड दौऱ्यापूर्वी निवृत्ती जाहीर करू नये अशी विनंती देखील केली होती. मात्र तरी देखील कोहली यांनी निवृत्ती जाहीर करून मंडळाला धक्का दिला आहे .आगामी इंग्लंड दौऱ्यावर विराट कोहली याला कर्णधारपद देण्याचे संकेत मिळत होते तरी देखील त्याने निवृत्ती जाहीर केल्याने आगामी इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाला मोठा धक्का दिला आहे .आगामी या दौऱ्यात ज्येष्ठ खेळाडूंनी निवृत्ती घेतल्याने अनुभवी खेळाडूंचा भरणा कमी असेल याचा फटका संघाला बसेल, अशी भीती भारतीय नियामक मंडळाला आहे.

विराट कोहली याने 123 कसोटी सामन्यांमध्ये 210 डावात 46.85 च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत .यामध्ये 30 शतके 31 अर्धशतकांचा समावेश आहे. अनेक विक्रम त्याने आपल्या नावावर नोंदवलेले आहेत. कसोटी पदार्पणात दुहेरी शतके करणारा कोहली हा एकमेव दुसरा क्रिकेटपटू आहे. 14 वर्षांपूर्वी जून 2011 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वेस्टइंडीज विरुद्ध पहिला कसोटी सामना त्यांनी खेळला आहे.