जम्मू काश्मीरमध्ये सात दहशतवाद्यांचा बीएसएफकडून खात्मा!

श्रीनगर : ऑपरेशन सिंदूर हल्ल्यात भारताने पाकिस्तान मधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उध्वस्त केले .भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तान आक्रमक झाले आहे त्यांनी भारतावर पलटवार करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही .जम्मू मधील सांबा सेक्टर मधून काल रात्री भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करणा्र्या जैस ए मोहम्मदच्या सात अतिरेक्यांना बीएसएफने कंठस्नान घातले.

पहेलगाम मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला. त्यातूनच ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान मधील नऊ दहशतवादी अड्डे उध्वस्त केले .या हल्यानंतर पाकिस्तान पूर्ण गोंधळून गेला होता ,सातत्याने भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र भारतीय सैन्य दल ते हल्ले हाणून पाडत आहे. याच दरम्यान जम्मू फ्रंटइयर बी एस एफ सांबा सेक्टर मध्ये आठ व नऊ मे च्या मध्यरात्री दहशतवाद्यांच्या एका गटाने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला .दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानी रेंजर्स च्या चौकीतून गोळीबार करण्यात आला .परंतु बीएसएफच्या सतर्क जवानांनी घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला .किमान सात दहशतवाद्यांचा खात्मा केला आणि पाकिस्तानचे मोठे नुकसान केले असे बीएसएफच्या प्रवक्त्याने म्हटले आहे.