21 लाखाची फसवणूक, वाकड पोलिसात गुन्हा!

वाकड : कॅनडा देशात नोकरी देण्याच्या बहाण्याने वाकड येथील एका व्यक्तीला 21 लाख 22 हजार रुपये घेत आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना 31 डिसेंबर 2023 ते 31 ऑगस्ट 2024 या कालावधीत घडली आहे. अनिरुद्ध अनिल धरवल ( रा. वाकड वय 36) यांनी याप्रकरणी 27 एप्रिल रोजी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने फिर्यादी अनिरुद्ध यांच्याशी इंस्टाग्राम वरून संपर्क केला. त्यांना कॅनडा देशात नोकरी देण्याचे आमिष दाखवले. नोकरी मिळवण्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून आरोपीने फिर्यादी कडून 21 लाख 22 हजार 609 रुपये घेतले. त्यानंतर त्यांना नोकरी न देता त्यांची फसवणूक केली .पैसे घेतल्यानंतरही नोकरी दिली जात नाही, तसेच आरोपी सोबत कोणताही संपर्क होत नसल्याने अनिरुद्ध यांनी वाकड पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदवला. याप्रकरणी वाकड पोलीस तपास करीत आहेत.