यशाचे रहस्य जाणून घ्यायचे असेल, तर अथक परिश्रम करा: प्रा.नितीन बानुगडे

पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व गुणवत्तापत्रक वितरण सोहळा उत्साहात
पुणे : यशाचे रहस्य म्हणजे मागे हटणे नाही आणि अथक परिश्रम करणे आणि जर तुम्ही त्याचे पालन केले तर डॉक्टर, इंजिनिअर, वैज्ञानिक बनण्याचा तुमचा दृढनिश्चय सार्थकी लागेल. “तुम्ही कोण आहात, यापेक्षा कोण होणार आहात, याचा विचार करा. कठोर परिश्रम, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि चांगले मार्गदर्शन घेण्यावर भर द्या. जितके जास्त कष्ट घ्याल, तितकेच मोठे यश मिळते. कुठलेही काम लहान, अवघड नसते. मनातून आपण खंबीर असलो की, सर्वकाही शक्य होते. मनापासून प्रयत्न कराल, तर नक्की यशस्वी व्हाल. मला डॉक्टर व्हायचे होते; पण योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. तुम्हाला मात्र आज ‘आयआयबी इन्स्टिटयूटसारखी ‘डॉक्टर, इंजिनिअर बनवणारी फॅक्टरी’ तुम्हाला मिळाली आहे. त्यामुळे तुमची जिद्द आणि त्यांची साथ एकत्रित झाली, तर देशाला चांगले डॉक्टर्स आणि इंजिनिअर्स मिळतील, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध वक्ते, लेखक व इतिहास अभ्यासक प्रा. नितीन बानुगडे पाटील यांनी केले.
पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व पुणे शहर माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ आणि आयआयबी करिअर इन्स्टिटयूट यांच्या संयुक्त विद्यमाने “गुणवत्ता संवर्धन अभियान २०२४-२०२५” अंतर्गत आयोजित मार्गदर्शन व गुणवत्तापत्रक वितरण सोहळा रविवारी, २० एप्रिल २०२५ रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते – “इयत्ता १० वी नंतर पुढे काय?” या ज्वलंत प्रश्नावर तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन करतांना बानुगडे बोलत होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक IIB करिअर इन्स्टिट्यूट, पुणे विभागाचे संचालक ॲड. महेश लोहारे यांनी केले. त्यांनी गुणवत्तेचे महत्त्व अधोरेखित करत या अभियानामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. विद्यार्थ्यांना काहीच अशक्य नाही हे नमूद करत पालकांची भूमिका देखील स्पष्ट केली. तसेच, आयआयबी करिअर इन्स्टिटयूटला २५ वर्षे पूर्ण झाल्यामुळे २५०० विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप जाहीर केली.
या कार्यक्रमाला मा. डॉ. भाऊसाहेब कारेकर (शिक्षणाधिकारी, माध्य. पुणे जि. प.), मा. सौ. छाया महेंद्रकर (उपशिक्षणाधिकारी, पुणे जि. प.), दशरथ पाटील सर, (व्यवस्थापकीय संचालक, IIB करियर इन्स्टिट्यूट, महाराष्ट्र), बालाजी वाकोडे-पाटील सर, (संचालक, IIB करियर इन्स्टिट्यूट, नांदेड), मा. श्री. नंदकुमार सागर (सचिव, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, मुंबई), प्रसाद गायकवाड (प्रवक्ता, राज्य मुख्याध्यापक महामंडळ, मुंबई), शिवाजी शिंदे (अध्यक्ष, पुणे शहर मुख्याध्यापक संघ), शिवाजी कामथे (कार्याध्यक्ष), किशोर बोरसे (सचिव) दैविक मंठाळे (संचालक, IIB करियर इन्स्टिट्यूट, शिवाजीनगर) उपस्थित होते.
यावेळी बानुगडे यांनी अतिशय प्रभावी व्याख्यान दिले. विद्यार्थ्यांना इतिहासातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांची उदाहरणे देत त्यांनी यशस्वी जीवनाच्या वाटा उलगडून दाखवल्या. या जगामध्ये तुम्हीच स्वतःला जिंकवून देऊ शकता दुसरे कोणी, आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत हे विसरू नका. अश्या प्रकारे त्यांनी मुलांना पण पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन करत त्यांनी “१० वी नंतर केवळ करिअर नव्हे, तर व्यक्तिमत्त्व घडविणे अधिक महत्त्वाचे आहे,” हे अधोरेखित केले. या सत्रात बालाजी वाकोडे-पाटील सरांनी आयआयबी करिअर इन्स्टिट्यूटच्या कार्यपद्धतीची ओळख करून देत विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून करिअर निवडीचे मार्गदर्शन केले.

या सत्राचा समारोप आयआयबीचे संचालक ॲड. कल्पना लोहारे मॅडम यांनी आभार प्रदर्शन करून केला. दुपारच्या सत्रात शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कारेकर यांनी शासनाच्या दृष्टीकोनातून गुणवत्तेची व्याख्या आणि शालेय व्यवस्थापनाचे महत्व स्पष्ट केले. राज्यस्तरीय संघटनेचे सचिव नंदकुमार सागर व प्रवक्ते प्रसाद गायकवाड यांनी मुख्याध्यापकांच्या योगदानाचे कौतुक करत पुढील योजनांची माहिती दिली.
या सत्रात पुणे शहरातील गुणवत्तापूर्वक कार्य करणाऱ्या ५१ शाळांना प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले. हे पुरस्कार भाऊसाहेब कारेकर, सौ. महेंद्रकर मॅडम आणि प्रसाद गायकवाड यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. हा कार्यक्रम पुणे शहर मुख्याध्यापक संघाच्या कार्यकारिणीने अत्यंत सुरळीतपणे पार पाडला. प्रमुख संयोजक म्हणून अध्यक्ष शिवाजी शिंदे, कार्याध्यक्ष शिवाजी कामथे, सचिव किशोर बोरसे यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.
कार्यक्रमाच्या यशामध्ये आयआयबी करिअर इन्स्टिट्यूट, पुणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. “Think NEET / Think JEE / Think IIB” हा संस्थेचा संदेश विद्यार्थ्यांना दिशा देणारा ठरला.
या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना केवळ मार्गदर्शनच नव्हे, तर आत्मविश्वास, विचारांची दिशा आणि यशाचा मंत्र मिळाला. पालकांना त्यांच्या भूमिकेची जाणीव झाली, तर शिक्षकांना प्रेरणा मिळाली. “गुणवत्ता संवर्धन अभियान” हे केवळ एक उपक्रम नसून, शैक्षणिक परिवर्तनाची नांदी आहे, हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.
पालक – विद्यार्थी यांच्या प्रतिक्रिया
“‘१० वी नंतर काय?’ या आयआयबी करिअर इन्स्टिटयूटने आयोजित केलेल्या उपक्रमात सहभागी होणे हे एक खूपच चांगले आणि माहितीपूर्ण अनुभव होता. या कार्यक्रमामुळे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना १० वी नंतर उपलब्ध असलेल्या विविध शिक्षण व करिअर पर्यायांची सखोल माहिती मिळाली
सर्व मार्गदर्शकांचे सादरीकरण अत्यंत प्रेरणादायी होते आणि त्यांनी आमचं मनोबल उंचावलं. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ दूर होतो आणि ते आत्मविश्वासाने योग्य निर्णय घेऊ शकतात. या कार्यक्रमासाठी आयआयबी करिअर इन्स्टिटयूटचे मनःपूर्वक आभार!”-जितेंद्र मोहिते (पालक)