यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता!

भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज
मुंबई : देशातील कष्टकरी बळीराजांसाठी चांगली बातमी असून यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने देशात सरासरीच्या 105% पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे .हा मान्सूनचा पहिला अंदाज असून पावसाळ्याच्या तोंडावर आणखी एक अंदाज व्यक्त केला जातो. स्कायमेट ने मान्सून बाबत अंदाज वर्तवला आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की ,ला निना या वादळाचा या हंगामात प्रभाव राहणार नाही. मान्सूनवर विपरीत परिणाम करणाऱ्या एल निनोची शक्यता नाकारण्यात आली आहे .एल निनो दक्षिणी दोलन फार न्यूट्रल राहणार असल्याने भारतात मान्सूनच्या पावसावेळी तो प्रभावी घटक ठरणार आहे .एल निनो शिवाय इतर घटक देखील मान्सून वर परिणाम करत असतात आयओडी सध्या प्रभावहीन असून यामुळे मान्सूनच्या सुरुवातीसाठी सकारात्मक चित्र आहे .

पावसाळ्यातील चार महिन्यांपैकी अर्धा कालावधी झाल्यानंतर मान्सूनला अधिक वेग मिळू शकतो. हिंदी महासागराची स्थिती एल निनो प्रभावी न होण्यासाठी उपयोगी ठरू शकते .त्यामुळे मान्सूनचा पाऊस चांगला राहू शकतो असा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. एक जून रोजी केरळमध्ये सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन होत असते, त्यानंतर सात ते आठ दिवसात मान्सून मुंबईच्या किनाऱ्यावर धडकतो यंदाही सरासरीच्या जास्त पावसाचा अंदाज व्यक्त केला गेल्याने मान्सून त्याच्या नियमित वेळेत भारतात दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे.