फक्त मुद्द्याचं!

16th June 2025
महाराष्ट्र

बॉलीवूड अभिनेते मनोज कुमार यांचे निधन!

बॉलीवूड अभिनेते मनोज कुमार यांचे निधन!

मुंबई : बॉलीवूड अभिनेते आणि सिने दिग्दर्शक मनोज कुमार यांचे आज सकाळी निधन झाले. वयाच्या 87 वया वर्षी त्यांनी कोकिळाबेन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला मनोज कुमार यांच्या निधनाने बॉलीवूडवर शोककळा पसरली आहे.

मनोज कुमार अनेक दिवसापासून आजारी असल्याने कोकिळाबेन रुग्णालयात उपचार घेत होते .बॉलीवूडचे भारत कुमार या नावाने ते ओळखले जात होते. देशभक्तीपर सिनेमासाठी ते प्रसिद्ध होते मनोज कुमार यांनी आपली सिने कारकीर्द 1957 मध्ये सुरू केली .या कालावधीत त्यांनी उपकार, पत्थर के सनम, सहारा, चांद, हनिमून पूरब और पश्चिम, नशीब ,मेरी आवाज सुनो, पिया मिलन की आस, यासारख्या सिनेमांमध्ये काम केले. मनोज कुमार यांचा जन्म 24 जुलै 1937 मध्ये पाकिस्तान मध्ये झाला. त्यांचे खरे नाव हरिकृष्ण गिरी गोस्वामी असे होते .देशाची फाळणी झाल्यावर ते कुटुंबासहित भारतात येऊन दिल्लीत स्थायिक झाले. मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने मध्ये सन्मानित करण्यात आले.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"