समृद्धी महामार्गावरील पथकरात १९ टक्क्यांची वाढ!

नवीन पथकर दर आजपासून लागू, ‘फास्टॅग’ही सक्तीचा
नागपूर – महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गावरील पथकरात १९ टक्क्यांची वाढ केली असून नवीन पथकर दर आज १ एप्रिलपासून लागू होणार आहेत. दुसरीकडे राज्यातील सर्वच महामार्गांवर टोलवसुलीसाठी आजपासून ‘फास्टॅग’ प्रणाली सक्तीची झाली असून सर्व ‘हायब्रीड’ मार्गिका मध्यरात्रीपासून बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी ‘फास्टॅग स्टिकर’ किंवा त्या खात्यात रक्कम नसल्यास दुप्पट पथकर द्यावा लागेल.
राज्याची राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूरमधील अंतर कमी करण्यासाठी, तसेच प्रवास अतिजलद करण्यासाठी मुंबई – नागपूर दरम्यान ७०१ किमी लांबीचा समृद्धी महामार्ग बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून समृद्धी महामार्गाची बांधणी करण्यात येत आहे. या महामार्गाच्या प्रत्यक्ष कामाला २०१९ पासून सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंत ७०१ किमीपैकी ६२५ किमी लांबीचा नागपूर-इगतपुरी प्रवासासाठी १०८०ऐवजी १२९० रुपये मोजावे लागतील. शेवटचा टप्पा सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई-नागपूर एकेरी प्रवासासाठी हलक्या चारचाकी वाहनांना १४४५ रुपये मोजावे लागतील.

केंद्राच्या निर्देशानुसार राज्य सरकारने पथकर नाक्यांवरील वसुलीसाठी आज, मंगळवारपासून ‘फास्टॅग’ सक्तीचा केला आहे. त्यामुळे राज्यभरातील सर्व पथकर नाक्यांवरील ‘हायब्रीड’ (फास्टॅक तसेच रोख रकमेची सुविधा असलेल्या) मार्गिका बंद करण्यात आल्या आहेत. राज्यात सार्वजनिक बांधकाम विभाग आणि एमएसआरडीसीकडून विविध रस्ते प्रकल्पांत पथकर वसुली केली जाते. एमएसआरडीसीकडून सध्या राज्यातील नऊ रस्ते प्रकल्पांत पथकर वसुली केली जाते.
एकेरी प्रवासासाठी पथकर
प्रकार जुना दर नवा दर
हलकी चारचाकी वाहने १०८० – १२९०
हलकी व्यावसायिक वाहने १७४५ – २०७५
बस, दोन आसांचे ट्रक ३६५५ – ४३५५
तीन आसांची व्यावसायिक वाहने ३९९० – ४७५०
बांधकाम यंत्रसामग्री ५७४० -६८३०
अतिअवजड वाहने ६९८० – ८३१५