वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा!

बबन गीते समर्थकांची कारागृहातच हाणामारी
बीड : बीड जिल्ह्यातील कारागृहात कैद्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाली असल्या बाबतची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आज सोमवारी कारागृहात कैद्यांच्या दोन गटात वाद झाला आणि दोन्ही गट एकमेकांना कारागृहातच भिडले आहेत. दरम्यान यावेळी बीडच्या तुरुंग प्रशासनाने वेळीच मध्यस्थी केल्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला आहे.
दरम्यान आज सोमवारी सकाळी बीड जिल्ह्यातील कारागृहात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामधील आरोपी वाल्मीक कराड व सुदर्शन घुले यांना जेलमध्ये असलेले आरोपी महादेव गिते व अक्षय आठवले यांनी मारहाण केल्याप्रकरणी माहिती मिळत आहे.

बीड जिल्ह्यातील परभणी येथील आरोपी मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड व सुदर्शन घुले व मरळवाडीचे सरपंच बापू आंधळे यांच्या खूनातील आरोपी महादेव गिते हा देखील जेलमध्ये आहे. आज जेलमध्ये महादेव गिते व अक्षय आठवले आणि वाल्मीक कराड व सुदर्शन घुले हे समोरा समोर आल्यावर यांच्यात वाद झाला होता. व त्यांनी यावेळी एकमेकांना शिव्या देखील दिल्याने यांच्यात यावेळी हाणामारी झाली. यात गिते व आठवले यांनी कराड व घुले यांना मारहाण केली असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या प्रकरणाचा राग गिते व आठवले यांना होता. त्यामुळे वाल्मीक कराड व सुदर्शन घुले हे त्यांच्या रडारवर होते. यावेळी जेल प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान या दोन गटात झालेल्या हाणामारी बाबत जेल प्रशासनाने दुजोरा दिला आहे.