कायद्याच्या रक्षकांनीच बसवला कायदा ध्याब्यावर!!

मध्यरात्री पोलिस स्टेशनसमोरच पोलिसाच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन; चौघे निलंबित
फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
पिंपरी, प्रतिनिधी : पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सांगवी पोलीस ठाण्यासमोरच रात्री बाराला पोलिस प्रवीण पाटील यांचा ‘बर्थ डे’ सेलिब्रेशन करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वाढदिवस साजरा करून “हरगीज झुकेगा नही साला’ या पुष्पा चित्रपटातील डायलॉगवरील रील सोशलमिडीयावर व्हायरल करणे महागात पडले आहे. याप्रकरणी चार पोलिसांना निलंबीत केले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याची बदली केली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात रात्री उशीरा राजकीय नेते, कार्यकर्ते आणि गुन्हेगार वाढदिवस साजरे केले जात आहेत, अशा तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र, कायद्याचे रक्षण करणारे पोलिसच सार्वजनिक शांततेचा भंग करून सार्वजनिक ठिकाणी पार्ट्या करीत असल्याचे उघड झाले आहे. बुधवार (५ मार्च ) संपताच रात्री १२ वाजता गुरुवार सुरू होण्याच्यावेळी सांगवीतील पोलिस ठाण्यातील कर्मचारी प्रवीण पाटील यांची मित्र मंडळी जमा झाली. त्यात पोलिस स्टेशनमधील इतर कर्मचारी आणि काही गुन्हेगारांचाही समावेश होता, असे प्रत्यक्षदर्शींचे मत होते.

मध्यरात्री बाराच्या ठोक्याला ‘दादा’ लिहलेला दुमजली केक कापण्यात आला. त्यावेळी इतरांच्या हातात फायर गन, स्काय शॉट होते. रस्त्यातच फटाक्यांची आतिषबाजी केली. आकाशात भुईनळ, या जल्लोषाचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केले आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ही केला आहे. पुष्पा चित्रपटातील “अब दिख रहा हूं ना मै जैसा दिखाना चाहिए वैसा. हरगीज झुकेगा नही साला … ” या डायलॉगवर रील केली आहे.
करण्यात आले. मात्र, व्हिडीओ सर्वत्र पसरल्या नंतर सर्व सामान्य नागरिकांकडून टीका होत आहे. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रकरणाची दखल घेतली आहे. बर्थ डे बॉय पोलिस अंमलदार प्रवीण पाटील याच्यासह अंमलदार विवेक गायकवाड, सुहास डंगारे, विजय मोरे यांचे तडकाफडकी निलंबन केले आहे. तर वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बनसोडे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे.