फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
महाराष्ट्र

आळंदीतील खासगी वारकरी संस्थांचे सर्वेक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवले दाबून?

आळंदीतील खासगी वारकरी संस्थांचे सर्वेक्षण जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवले दाबून?

अल्पवयीन मुलाकडे संगीत शिक्षकाची शरीर सुखाची मागणी
आळंदी : आळंदी आणि परिसरात वारकरी शिक्षण संस्थांमध्ये अनैसर्गिक अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. म्हणूनचं इथल्या खाजगी शिक्षण संस्था बंद करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे. जानेवारीपासून हा तिसरा तर आतापर्यंत सातवा गुन्हा दाखल झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी वीस पथकं नेमून आळंदीत सर्वेक्षणही केलं. मात्र आतापर्यंत किती संस्था बेकायदा किंवा अनधिकृत आहेत याची माहिती समोर आलीच नाही.

आळंदीत खासगी वारकरी संस्थेत विनयभंग
आळंदीतील खासगी वारकरी शिक्षण संस्थेत पु्न्हा एकदा अल्पवयीन विद्यार्थ्यावर अनैसर्गिक अत्याचाराची घटना घडली आहे. देहू फाटा परिसरातील एका संस्थेत 15 वर्षीय विद्यार्थ्यांकडे संगीत विषयाच्या शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केली. घाबरलेल्या विद्यार्थ्याने संस्थाचालकाला ही बाब सांगितली. मात्र त्यांनी कोणतीच कारवाई केली नाही. अखेर विद्यार्थ्याने दिघी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. शिक्षकासह संस्था चालकावरही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जानेवारी महिन्यापासून तिसरी तर आतापर्यंतची सातवी अशी घटना घडली

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सुद्धा आळंदीतील सातत्याने घडणाऱ्या या प्रकाराला गांभीर्यानं घेतलं आहे. त्यांनी या आधी 48 तासांमध्ये अनधिकृत खासगी वारकरी संस्था बंद करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर रुपाली चाकणकर यांचंही याकडे दुर्लक्ष झाल्याचं दिसून येतंय. त्याचमुळे आताची ही ताजी घटना घडली आहे. वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीमधील वारकरी शिक्षण संस्थांमध्ये गैरप्रकार सुरू असल्याच्या आणि मुलांचे लैंगिक शोषण होत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

खासगी वसतीगृहांसाठी नियमावली
बालकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या शासन निर्णयानुसार खाजगी वसतीगृहांसाठी नियमावली करण्यात आली आहे. या नियमावलीचे पालन न करणाऱ्या संस्थांचा अहवाल सात दिवसात सादर करावा असं आदेश देण्यात आले आहेत. संस्था सुरू करण्यासाठी जिल्हा महिला व बालविकास विभाग यांची परवानगी तसेच धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी नसलेल्या संस्थांवर दोन दिवसात कारवाई करण्याचा आदेश या आधी देण्यात आला आहे.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"