फक्त मुद्द्याचं!

8th September 2025
महाराष्ट्र

रायगड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

रायगड जिल्ह्यात भूकंपाचे धक्के

फक्त मुद्द्याचं न्यूज नेटवर्क
रायगड : रायगड जिल्ह्यात पेण, सुधागड तालुक्यात आज सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. पेणच्या तिलोरे, वरवणे तसेच सुधागड तालुक्यातही महागाव, भोपेची वाडी, देऊळ वाडी, कवेळीवाडी भागात जमिनीला हादरे बसल्याची माहिती समोर आली.

पेण तहसीलदार तानाजी शेजाळ आणि सुधागड तहसीलदार कुंभार यांनी ही माहिती मिळताच तातडीनं प्रभावित गावांना भेट दिली. महसूल विभागाच्या पथकासह ते गावांमध्ये दाखल झाले. रायगडमधील वरील गावांमध्ये जमिनीला हादरे बसले. काही घरांधील भांडी हलली आणि आवाज आला अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. दरम्यान यामध्ये इतर कोणतंही नुकसान झालं नाही अशी माहिती ग्रामस्थांनी प्रशासनाला दिली.

असे असले तरीही भूकंपामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. सदर प्रकरणाची माहिती महसूल प्रशासनाने वेधशाळेला दिली. हवामान विभागाच्या भूकंप मापन केंद्र किंवा संकेत स्थळावर याची नोंद नाही ही बाब यावेळी समोर आली. ज्यामुळे आता जिओलोजिकल सर्व्हे ऑफ इंडिया संस्थेला सर्वेक्षण करण्याची विनंती करणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.

Written By
टीम फक्त मुद्याचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"