फक्त मुद्द्याचं!

17th June 2025
देश विदेश

दिल्ली-NCRमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के!

दिल्ली-NCRमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के!

लोकांमध्ये भीतीचे वातावरण
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सोमवारी भूकंपाचे जोरदार हादरे जाणवले. काही सेकंदापर्यंत जमीन हलत होती. लोक भयभीत झाल्याने घराच्या बाहेर निघाले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार हा भूकंप ४.० रिश्टर स्केल तीव्रतेचा होता.

भूकंपाचा केंद्र दिल्लीच्या जवळ जमिनीपासून ५ किमी खोल होते. यामुळे याचे धक्के अधिक जाणवले. काही सेकंदापर्यंत जमीन हलत राहिल्याने इमारतींच्या आतमध्ये जोरदार कंपन जाणवले. भूकंप सकाळी ५ वाजून ३६ मिनिटांना आला. यामुळे लोकांची झोपच उडाली.

पंतप्रधान मोदींनी एक्सवर एक पोस्ट करत लोकांना सावधानता बाळगण्याचे आवाहन केले. दिल्ली आणि जवळच्या परिसरात भूकंपाचे झटके जाणवले. सर्वांना शांत राहण्याचे तसेच योग्य ती सुरक्षा बाळगण्याचे आवाहन करतो. अधिकाऱी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

अधिकाऱ्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार भूकंपाचा केंद्र धौला कुआंमध्ये दुर्गाबाई कॉलेज ऑफ स्पेशल एज्युकेशनजवळ होता. जिथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता तेथे एक नाला आहे. या परिसरात दर दोन ते तीन वर्षात एखादा लहान आणि कमी तीव्रतेच्या भूकंपाचे झटके बसत असतात. २०१५मध्ये येथे ३.३ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आला होता.

Written By
टिम फक्त मुद्द्याचं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Home
Email
Search
× Add a menu in "WP Dashboard->Appearance->Menus" and select Display location "WP Bottom Menu"